महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना इफेक्ट : पुण्यात फटाका विक्रीत 50 टक्क्यांची घट - पुणे फटाके विक्री

फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्यावर अलीकडे नागरिकांचा भर असल्याचे दिसून येते. त्यात यंदा कोरोनामुळेही नागरिकांची आर्थिक अवस्था बिकट आहे. त्यामुळे याचाच फटका यंदा फटाका विक्रीला बसला आहे.

पुणे
पुणे

By

Published : Nov 13, 2020, 5:30 PM IST

पुणे- दिवाळी आणि फटाके हे समीकरण ठरलेलंच.. मात्र, मागील काही वर्षांपासून हे समीकरण बदलले जात आहे. फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्यावर अलीकडे नागरिकांचा भर असल्याचे दिसून येते. त्यात यंदा कोरोनामुळेही नागरिकांची आर्थिक अवस्था बिकट आहे. त्यामुळे याचाच फटका यंदा फटाका विक्रीला बसला आहे. पुणेकरांनी फटाका खरेदीला अल्प प्रतिसाद दिल्यामुळे विक्रेते मात्र हवालदिल झाले आहेत.

पुण्यात फटाका विक्रीत 50 टक्क्यांची घट
प्रबोधनामुळे नागरिकांची फटाक्यांकडे पाठफटाके उडविणे अनेकांच्या जीवावर बेतले असल्याच्या अनेक घटना यापूर्वीही उघडकीस आल्या आहेत. दिवाळीदरम्यान तर अशा घटना प्रकर्षाने घडताना दिसून येतात. फटाक्यांच्या वापरामुळे पशु-पक्ष्यांनाही त्रास होतो, हे अनेकदा सिद्ध झाले. त्याचबरोबर पर्यावरणालादेखील फटाक्यांमुळे हानी होत असते. तसेच प्रदूषण रोखण्यासाठी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्यात यावी, असे आवाहनही अनेक माध्यमांतून करण्यात येत असते. वरील सर्व गोष्टींमुळे नागरिकांनी फटाक्यांकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.फटाके विक्रीत 50 ते 60 टक्क्यांची घटपुण्यातील फटाका विक्रेते कैलास सोनवणे म्हणाले, कोरोनाचा परिणाम फटाके विक्रीवरही झाला आहे. फटाक्यांच्या विक्रीत 50 ते 60 टक्के घट झाली आहे. यावर्षी फटाक्यांची विक्री निम्म्यावर आली आहे. लहान मुलांच्या इच्छेखातर नागरिक फटाके खरेदी करताना दिसत आहेत.चायनीज फटाके बाजारपेठेत नाहीत

फटाक्यांचा बाजारात दरवर्षी चायनीज फटाकेही उपलब्ध असतात. परंतु, यंदा पुण्यातील फटाक्यांच्या बाजारपेठेत कुठेही चायनीज फटाके दिसत नाहीत. चायनीज फटाके स्वस्त असल्यामुळे त्यांना बाजारात चांगली मागणी असते. त्याची गुणवत्ता चांगली नसली तरी स्वस्त असल्यामुळे नागरिक हे फटाके खरेदी करतात. पण यावर्षी आम्ही चायनीज फटाके मागवले नाहीत, असे कैलास सोनवणे यांनी सांगितले.

लहान मुलांमध्ये अजूनही फटाक्यांचे आकर्षण

फटाके विकत घेण्यासाठी आलेली एक ग्राहक महिला म्हणाली, प्रदूषण होऊ नये यासाठी फटाके फोडू नये, असे प्रबोधन वारंवार करण्यात येते. त्यामुळे नागरिकांमध्ये याविषयी जागरूकता निर्माण झाली. परंतु, लहान मुलांमध्ये फटाक्यांविषयीचे आकर्षण आहे. त्यामुळे त्यांचा हट्ट पूर्ण करण्यासाठी थोडेफार फटाके घ्यावेच लागतात. मुलांच्या हट्टाखातर थोडेफार फटाके आम्ही खरेदी केले. त्यामुळे आजही मी आवाज न करणारे, धूर न करणारे आणि प्रदूषण न करणारे काही फटाके विकत घेतले आहेत.

ग्राहकांनी पाठ फिरवल्याचा फटका मात्र फटाके विक्रेत्यांना बसला आहे. विक्रीसाठी आणलेल्या फटाक्यांचे पुढे काय करायचे? हा प्रश्न त्यांना सतावत आहे. दिवाळीच्या दिवसात विकले न केलेले फटाके पुढे कुठे ठेवायचे? असा प्रश्न विक्रेत्यांना पडतो. त्यामुळे कमी दरात का होईना हे फटाके विकून टाकण्याकडे त्यांचा कल असतो.

ABOUT THE AUTHOR

...view details