महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यात पुन्हा जळीतकांड, पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांना आग - पुण्यात आग

इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या वाहनांना आग लागून ११ वाहने भस्मसात झाली. सदर घटनेचे कारण अद्याप अस्पष्ट असून अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे.

आग

By

Published : Oct 6, 2019, 8:58 AM IST

पुणे - इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या वाहनांना आग लागून ११ वाहने भस्मसात झाली. सदर घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास पर्वती पायथा, सानेगुरुजी शाळेसमोर बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये घटल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत 6 दुचाकी व 1 रिक्षा पूर्णत: जळाल्या. तर, 4 दुचाकींना आगीची झळ बसली. घटनेचे कारण अद्याप अस्पष्ट असून अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details