पुणे - मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथील औद्योगिक वसाहतीमधील एसव्हीएस या कंपनीला सोमवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत १८ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. या कामगारांना ससून रुग्णालयात पंचनाम्यासाठी दाखल करण्यात आले आहे. यावेळी येथील मृतांच्या नातेवाईकांसोबत ई. टीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी संवाद साधला...
मृत कामगार महिलेच्या पतीने केल्या भावना व्यक्त जे चित्र पाहिले सर्व भयावह -
१८ कामगारांमध्ये पंधरा कामगार ह्या महिला आहेत. सकाळीच मी माझ्या पत्नीला कंपनीत सोडले आणि त्यानंतर मी कामावर गेलो. आणि दुपारच्या सुमारास मला कंपनीत असताना कळाले की माझ्या पत्नीच्या कंपनीत आग लागली आहे. पण हे माहीत नव्हते की त्या आगीत माझ्या पत्नीला काही झाले आहे. पण तिथे गेल्यानंतर जे चित्र पाहिले ते भयावह होते. संपूर्ण जळून खाक झाले होते. अशी भावना मृत कामगार महिलेच्या पतीने व्यक्त केलीय.
तेव्हा सर्व जळून खाक झाले होते -
आम्ही दोघे नवरा-बायको काम करत होतो. ती एसव्हीएस कंपनीत आणि मी दुसऱ्या ठिकाणी काम करत होतो. घरात लहान मुलांना घरीच सोडून आम्ही काम करत होतो. रोज मी तिला कंपनीत सोडून कामावर जातो. आजही सकाळी पाहिले तिला कामावर सोडले आणि मग मी कामावर गेलो. पण जेव्हा दुपारी कळाले की, तिच्या कंपनीत आग लागली आहे. त्या आगीत ती अडकली आहे तेव्हा मला काहीच सूचत नव्हते. मी मित्रासोबत कंपनीत आलो. तेव्हा सर्व जळून खाक झालेले होते. शासनाने मदतीची घोषणा केलीय मात्र या मदतीने आमच्यातून गेलेल्यांची पोकळी भरून निघणार नाही. अशी भावना यावेळी मृतांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.
मग लोक बाहेर कसे निघतील -
मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथील औद्योगिक वसाहतीमधील एसव्हीएस या कंपनीला फक्त एक छोटासा गेट लावण्यात आलेला आहे. एक खिडकी आणि एक बारीक दरवाजा फक्त लावण्यात आलेले आहे. मग लोक बाहेर कसे निघतील असा सवाल नातेवाईकांनी उपस्थित केला आहे.
Pune Fire: पिरंगुट MIDC मधील केमिकल कंपनीला भीषण आग, 18 कामगारांचा होरपळून मृत्यू