पुणे -शहराजवळील पिंपरी-चिंचवड येथे गॅस गळती होऊन लागलेल्या आगीत दोन महिला जखमी झाल्या आहेत. चिंचवड येथील झोपडपट्टीत रविवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. लक्ष्मी विलास धोतरे (35) आणि संगीता गणेश पवार (27) अशी जखमींची नावे आहेत.
पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस गळती होऊन लागलेल्या आगीत दोन महिला जखमी - पुणे news
चिंचवड शहरात असणाऱ्या झोपडपट्टीतील एका घरात गॅस गळती होऊन लागलेल्या आगीत दोन महिला जखमी झाल्या आहेत. रविवारी अकराच्या सुमारास ही घटना घडली.
घरात स्वयंपाक बनवण्यात महिला व्यस्त असताना ही घटना घडली. अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत, पुढील कारवाई पार पाडली. आगीत जखमी झालेल्या महिलांना महानगरपालिकेच्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
रविवारी सकाळी अकराच्या सुमारास कुटुंबातील एक मृत पावलेल्या व्यक्तीचा सावडण्याचा कार्यक्रम होता. त्यामुळे घरात काही महिला स्वयंपाक करत होत्या. अचानक रेग्युलेटरमधून गॅस गळती झाली आणि भीषण आग लागली. या घटनेत दोन महिला जखमी झाल्या आहेत. घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहेत. पिंपरी येथील अग्निशमन दलाच्या गाड्या वेळेत पोहचल्याने आग आटोक्यात आणण्यात आणली. दोन जखमी महिला रूग्णालयात असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.