पुणे- कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथे गेल्या दहा दिवसांपासून भयावह परिस्थिती आहे. अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. तर कित्येक जणांचा मृत्यू या महापुरामुळे झाला आहे. अशा संकटात सापडलेल्या नागरिकांना सामाजिक बांधिलकी म्हणून राज्याच्या कानाकोपऱ्यातून सर्वच स्तरातून मदत केली जात आहे. त्याच प्रमाणे पुणे जिल्ह्यातूनही या पूरग्रस्तांसाठी खाद्य पदार्थाचा पुरवठा केला जात आहे. यामध्ये ५ लाख पुऱ्या आणि शेंगा चटणीचा समावेश आहे.
पूरग्रस्तांची भूख भागविण्यासाठी मावळमधून ५ लाख पुऱ्यासह शेंगा चटणीचा पुरवठा - पुणे पुरग्रस्तांना मदत बातमी
कोल्हापूर,सांगली आणि सातारा येथे गेल्या दहा दिवसांपासून भयावह परिस्थिती आहे. अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. तर कित्येक जणांचा जीव पुराच्या पाण्याने घेतले आहेत.
![पूरग्रस्तांची भूख भागविण्यासाठी मावळमधून ५ लाख पुऱ्यासह शेंगा चटणीचा पुरवठा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4106027-thumbnail-3x2-pune.jpg)
सांगली, कोल्हापुरात आलेल्या पुरात आणखी हजारो नागरिक पाण्यातच अडकलेले आहेत. गेल्या दोन दशकात असा भयावह पाऊस झाला नसल्याचे नागरिक सांगतात. या नागरिकांचे संसार वाहून गेले आहेत. त्यामुळे या सर्वांना अन्नांचा पुरवठा करण्यात सर्वच स्तरातून मदत करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ परिसरातूनही अन्नाची पाकिटे पाठविली जात आहेत. मावळ मधून तब्बल ५ लाख पुऱ्या आणि त्यासोबत शेंगदाण्याची चटणी हे पाठविले जात असून दोन घास पूर परिस्थिती अडकलेल्या व्यक्तींच्या तोंडात जावा अशी अपेक्षा बाळगून ही मदत केली जात आहे. तीन टप्प्यात ही अन्नाची पाकिटे पूरग्रस्त भागात पोहोचविण्यात येणार आहेत.
ग्रामस्थांनी दाखवलेल्या एकजुटीमुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. तर समाजातील दानशूर व्यक्तींनी आपली जबाबदारी ओळखून मदत करण्याचे आवाहन ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. खारीचा वाटा आणि आपली नैतिक जबाबदारी ओळखून माणूसकीच्या नात्याने आपली सर्व कामे बाजूला ठेवून कोणत्याही क्षेत्रात पुणेकर मागे नाहीत हे पुन्हा एकदा दाखवून दिल आहे. खर तर राज्यातून अनेक सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती जमेल ती मदत करत आहेत. फुल नाही फुलाची पाकळी असे म्हणून अनेक जण मदत करायला सरसावत आहेत. महाराष्ट्रात मराठी माणसावर संकट आले की खचून न जाता प्रत्येक मराठी माणसाची पावले हे संकट दूर करण्याचा दिशेने वाटचाल करत असतात, सर्व जण एकत्र येतात याचेच हे मोठे उदाहरण आहे.