पुणे -कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी केलेल्या आवाहन केले आहे. त्याला सर्वांनी 100 टक्के प्रतिसाद द्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर यांनी केले आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासन-प्रशासन विविध निर्णय घेत आहेत. त्याची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यात काय मदत हवी आहे, ही माहिती त्यांना देण्यात आली. तसेच या परिस्थितीत ज्या वस्तूंची गरज आहे त्या मिळवण्याच्या दिशेने हालचाली सुरू झाल्या आहेत. तसेच केंद्रिय मंत्री प्रकाश जावडेकरांनीही आज (शनिवारी) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यांनी त्यांनीदेखील येथील परिस्थिती जाणून घेतली आणि आम्ही त्यांना सर्व ती माहिती दिली. या आधारे केंद्र शासन योग्य तो निर्णय घेईल, असेही ते म्हणाले.