महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Covid Vaccination In Pune : उपमुख्यमंत्री अजितदादांचा बारामती तालुकाच लसीकरणात मागे, ७० हजार नागरिकांनी घेतला नाही एकही डोस - कोविड-१९ ओमायक्रॉन

लस न घेतलेल्यांवर कारवाई करण्याचा इशारा देणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy CM Ajit Pawar ) यांच्या बारामती तालुक्यात ७० हजार नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लसीचा ( Covid Vaccination Baramati ) एकही डोस घेतलेला नाही. त्यामुळे लसीकरणासाठी आता कोणती नवीन पद्धत वापरली जातेय, हे पाहणे महत्वाचे आहे.

बारामती तालुका
बारामती तालुका

By

Published : Dec 18, 2021, 4:25 PM IST

पुणे : पुणे जिल्ह्यातील शंभर टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार ( Deputy CM Ajit Pawar ) यांनी दिले आहेत. तसेच वेळ पडल्यास लस न घेणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा इशारा देखील पवार यांनी दिला होता. मात्र, त्यांच्याच बारामती तालुक्यातल्या ७० हजार ६०८ लोकांनी लसीचा एकही डोस घेतलेला ( Covid Vaccination Baramati ) नाही. तर जिल्ह्यात एकही डोस न घेतलेल्या नागरिकांची संख्या ( Vaccinated In Pune District ) 2 लाख ६९ हजार ३३७ इतकी आहे.


कोविड-१९ च्या ओमायक्रॉन ( Covid Omicron Variant ) या नव्या स्वरूपाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन शंभर टक्के लसीकरणासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, जिल्ह्यातल्या २ लाख ६९ हजार ३३७ लोकांनी अद्याप एकही डोस घेतलेला नाही. कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेल्या लोकांना ओमायक्रॉनचा धोका कमी असल्याने, लसीकरणावर भर दिला जात असतानाच एकही लस न घेणाऱ्यांची संख्यादेखील खूपच अधिक आहे. यामध्ये सर्वाधिक लोक बारामती, दौंड, इंदापूर, भोर, हवेली, जुन्नर आणि पुरंदर तालुक्यातील आहेत. यामुळेच आता लस घेण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

२ लाख ६९ हजार लोकांनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही

राज्यासह जिल्ह्यात जानेवारी २०२१ महिन्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. पण सुरुवातीचे सहा महिने लसीकरणाचा वेग खूपच कमी होता. परंतु जुलै, ऑगस्टपासून केंद्र शासनाने पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली. यामुळेच जिल्ह्यात खऱ्या अर्थाने ऑगस्टनंतरच लसीकरण मोहिमेला वेग आला. आतापर्यंत शंभर टक्के पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाल्याचा दावा करत असले तरी, जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल २ लाख ६९ हजार ३३७ लोकांनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही.

नागरिकांचे समुपदेशन करणे सुरू

पुणे शहरातील 100 टक्के लसीकरण पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहोत. लस ही ऐच्छिक आहे. तरीही नागरिकांनी ती घ्यावी यासाठी आरोग्य विभागामार्फत आपण नागरिकांचे समुपदेशन सुरूच ठेवले आहे. त्याचमुळे सुमारे १३ हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. अशी माहिती पुणे महापालिका आरोग्य प्रमुख डॉ. आशीष भारती यांनी दिली.

लसीकरणाची तालुकानिहाय आकडेवारी

बारामती ७०,६०८
भोर ३२,३३६
दौंड ५०,७३६
हवेली ४७,९६२
इंदापूर ४७,९६२
जुन्नर ७,८८६
पुरंदर ११,८५०
एकूण : २,६९,३३७

ABOUT THE AUTHOR

...view details