पुणे - आज (१९ एप्रिल) दिवसभरात ४२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, एकूण 586 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज कुठल्याही कोरोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू झाला नाही. ही पुणेकरांसाठी दिलासादायक बाब आहे.
पुण्यात आज दिवसभरात ४२ कोरोनाग्रस्तांची वाढ - pune corona update
आज (१९ एप्रिल) दिवसभरात ४२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, एकूण 586 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज कुठल्याही कोरोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू झाला नाही. ही पुणेकरांसाठी दिलासादायक बाब आहे.
पुण्यात आज दिवसभरात ४२ कोरोनाग्रस्तांची वाढ तर एकही रुग्ण दगावला नाही
डॉ. नायडू रुग्णालयामध्ये एकूण १८१ रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाचा संसर्ग झालेले १८ रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच १५ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ससून रुग्णालयामध्ये ११ रुग्णांवर तर इतर खासगी रुग्णालयात ४ कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत.