महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 5, 2020, 7:08 AM IST

Updated : Jul 5, 2020, 9:32 AM IST

ETV Bharat / state

तस्मै श्री गुरवे नमः : 'संकटकाळात लढण्याचे बळ गुरूंमुळेच मिळाले'

आज गुरुपौर्णिमा आहे. त्यानिमित्त आम्ही तुमच्यासाठी 'तस्मै श्री गुरवे नमः' ही सिरीज घेऊन आलो आहोत. त्याद्वारे पुणे विभागाचे आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी गुरूबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

pune deparment commissioner deepak mhaisakar  deepak mhaisakar on gurupournima  gurupournima special  gurupournima importance  गुरुपौर्णिमा विशेष  गुरुपौर्णिमेचे महत्व  पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर  गुरुपौर्णिमेबाबत डॉ. दीपक म्हैसेकर
तस्मै श्री गुरवे नमः : 'संकटकाळात लढण्याचे बळ गुरूंमुळेच मिळाले'

पुणे - माझे पहिले गुरू आई-वडील आहे. ते दोघेही शिक्षकी पेशातील आहे. माझी जडणघडणीमध्ये सर्वात मोठा त्यांचा वाटा आहे. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनामध्ये वेगवेगळे गुरू भेटत गेले. त्यांनी प्रत्येक संकटांना कसे सामोरे जायचे? हे मला माझ्या गुरुंनी सांगितले. त्यामुळे कोल्हापूर, सांगली महापूर, नांदेडच्या गोदावरीला आलेला पूर यासोबतच आता आलेले कोरोनाचे संकट, या सर्व संकटांना सक्षमपणे सामोरे गेलो. ते फक्त माझ्या गुरूंमुळे शक्य होऊ शकले, असे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.

तस्मै श्री गुरवे नमः : 'संकटकाळात लढण्याचे बळ गुरूंमुळेच मिळाले'

कोणत्याही गोष्टीचा मुळापासून अभ्यास करायचा, हे मला माझ्या गुरुंनी शिकवले. त्यामुळे मी प्रत्येक आलेल्या संकटांचा मुळापासून अभ्यास करतो. मग तो सांगलीचा महापूर असेल, की कोरोना. महापुराची कारणे काय? याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न मी करत असतो. हा गुण मला फक्त माझ्या गुरूंकडून मिळाला. त्यामुळे माझ्या आयुष्यात आलेल्या संकटांना मी सामोरे जाऊ शकलो. पाच जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळताना देखील मला माझ्या गुरूंनी ज्या काही गोष्टी शिकवल्या त्याचा फायदा झाला असल्याचे डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले. तसेच त्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या सर्व गुरुंना वंदन केले.

Last Updated : Jul 5, 2020, 9:32 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details