महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कहरच! वाढदिवसाला मनासारखं गिफ्ट दिलं नाही म्हणून पत्नीने केला पतीचा खून - पुणे वाढदिवस गिफ्ट

Wife Killed Husband : पत्नीनं चक्क बांधकाम व्यावसायिक पतीचा खून केल्याची धक्कादाक घटना पुण्यात घडली आहे. वाढदिवसाला गिफ्ट न दिल्यानं हा खून केला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी आरोपी पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

Etv Bharat
Etv Bharat

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 24, 2023, 8:38 PM IST

Updated : Nov 24, 2023, 9:30 PM IST

माहिती देताना पोलीस अधिकारी

पुणे wife killed husband : दररोजच्या आयुष्यात पती-पत्नीमध्ये भांडणं होत असतात आणि नंतर भांडणाचं रुपांतर प्रेमात होताना आपल्याला पाहायला मिळतं. पण असं असताना पुण्यातील वानवडी परिसरात खळबजनक घटना घडली आहे. पत्नीनं घरगुती वादातून बांधकाम व्यावसायिक पतीचा खून (Pune Crime News) केलाय. ही घटना शुक्रवारी (24 नोव्हेंबर) दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान वानवडी येथील एका उच्चभू सोसायटीत घडली आहे.

आरोपी पत्नीला घेतलं ताब्यात : निखील पुष्पराज खन्ना (वय-36) असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव असून, ते बांधकाम व्यावसायिक होते. याप्रकरणी पत्नी रेणुका निखील खन्ना (वय-38 रा. वानवडी) हिला वानवडी पोलिसांनी चौकशी करुन ताब्यात घेतलंय. या घटनेनं पुण्यात खळबळ उडाली आहे.

सहा वर्षापूर्वी झाला होता प्रेमविवाह : शुक्रवारी दुपारच्या सुमारास घरगुती वादातून आरोपी पत्नी रेणुका हिनं पती निखील यांच्या तोंडावर ठोसा मारला. यानंतर त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. मृत निखील खन्ना हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांच्या घरी आई-वडील,पत्नी असे चारजण राहतात. निखील आणि आरोपी पत्नी रेणुका यांचा सहा वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता. पोलिसांनी आरोपी रेणुका हिची चौकशी करुन ताब्यात घेतलंय.

गिफ्ट न दिल्याने केला खून : वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गंगा शाखेले ही सोसायटी आहे. या सोसायटीमध्ये बांधकाम व्यावसायिक निखील खन्ना हे पत्नी आणि आई, वडिलांबरोबर राहत होते. शुक्रवारी दुपारी निखीलचे आई-वडील हे कामानिमित्त बाहेर गेले असताना, निखील आणि पत्नी रेणुका यांच्यात 'वाढदिवसाला गिफ्ट का दिलं नाही? Anniversary ला पण गिफ्ट का दिलं नाही?' म्हणून वाद सुरू होते, अशी माहिती वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी दिली.

ससूनमध्ये केलं होतं दाखल : शुक्रवारी दुपारी दीड वाजल्याच्या सुमारास या दोघांमध्ये भांडण झालं आणि आरोपी रेणुकानं निखीलच्या तोंडावर ठोसे मारले. यात निखीलच्या नाकाचे हाड फॅक्चर झाले होते. याची तत्काळ माहिती मिळताच आम्ही घरी गेलो आणि त्यांना प्राथमिक उपचार मिळावे म्हणून ससून रुग्णालयात घेऊन गेलो. तेव्हा उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी निखीलला मृत घोषित केलं, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा -

  1. घरासमोर दुचाकीचा हॉर्न मोठ्यानं वाजविणं पडलं महागात; भाडेकरूकडून घरमालकाची हत्या
  2. Thane Crime News : धक्कादायक! आपल्या मुलाशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या महिलेचा बापाने कट रचून केला खून
  3. साडेतीनशे रुपयासाठी तरुणाला 50 वेळा चाकुनं भोसकलं; हत्येनंतर अल्पवयीन क्रूरकर्मा मृतदेहापुढं नाचला
Last Updated : Nov 24, 2023, 9:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details