महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Pune Crime News : व्हॉट्सअप ग्रुपमधून रिमूव्ह केल्याने पाच जणांनी ग्रुप ॲडमीनची कापली जीभ - व्हॉट्सअप ग्रुपमधून काढलं तर कापली अ‍ॅडमिनची जीप

सोसायटीतील सदस्यांनी काढलेल्या व्हॉट्सअप ग्रुपमधून (Whats app Group) रिमूव्ह (Remove) केल्यावरून बाचाबाची झाल्यानंतर पाच जणांनी ग्रुप अ‍ॅडमिनला (Admin) बेदम मारहाण केल्याची घटना घडली. एवढेच नव्हे तर मारहाणीत अ‍ॅडमिनची जीभ कापली (Tongue was cut off) गेली आहे. याप्रकरणी ३८ वर्षीय महिलेने (Hadapsar Police Station) हडपसर पोलीस ठाण्यात (Pune Crime News) तक्रार दिली आहे. त्यावरून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime News
ग्रुप अ‍ॅडमिनला बेदम मारहाण करीत जीभ कापली

By

Published : Jan 3, 2023, 2:25 PM IST

पुणे : सध्या वाढत असलेल्या सोशल मीडियाच्या प्रभावामुळे कधी काय होईल हे कोणीही काहीही सांगू शकत नाही. कधी व्हॉट्सॲप वरून गोंधळ तर कधी ग्रुप बनवून विविध चर्चा अश्या गोष्टी प्रत्येकाच्या व्हॉट्सॲपमध्ये पाहायला मिळतात. अश्यातच पुणे शहरातील फुरसुंगी (Pune Crime News) येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. सोसायटीतील सदस्यांनी काढलेल्या व्हॉट्सअप ग्रुपमधून (Whats app Group) रिमूव्ह (Remove) केल्यावरून बाचाबाची झाल्यानंतर पाच जणांनी ग्रुप अ‍ॅडमिनला (Admin) बेदम मारहाण केल्याची घटना घडली. एवढेच नव्हे तर मारहाणीत अ‍ॅडमिनची जीभ कापली (Tongue was cut off) गेली आहे.

काय आहे नेमका प्रकार? :पुण्यातील फुरसुंगीत (Fursungi) हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सोसायटीतील सदस्यांनी काढलेल्या व्हॉट्सअप ग्रुपमधून रिमूव्ह केल्यावरून बाचाबाची झाल्यानंतर पाच जणांनी ग्रुप अ‍ॅडमिनला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. मारहाणीत या टोळक्याने अ‍ॅडमिनची जीभच कापली गेली आहे. त्यांच्या जीभेला टाके पडले असून, यात ते गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी 38 वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) तक्रार दिली आहे. त्यावरून पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 28 डिसेंबर रोजी घडला आहे.

तक्रारदार आणि आरोपी एकाच सोसायटीतील :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार दाम्पत्य आणि आरोपी एकाच सोसायटीत राहण्यास आहेत. सोसायटीतील रहिवाशी असणाऱ्या व्यक्तींचा तक्रारदारांच्या पतीने ओम हाईट्स ऑपरेशन या नावाने व्हॉट्सअप ग्रुप काढला होता. त्यात सर्व सदस्य होते. तक्रारदार यांचे पती या ग्रुपचे अ‍ॅडमिन होते. दरम्यान, त्यांनी या ग्रुपमधून सोसायटीतील एका व्यक्तीला रिमूव्ह केले. याचा राग आरोपींच्या मनात होता. त्यांनी रिमूव्ह का केले असा मॅसेज तक्रारदारांच्या पतीला व्हॉट्सअपला टाकून विचारणा केली. पण, त्यालाही तक्रारदार यांच्या पतीने उत्तर दिले नाही.

ॲडमिनाल बेदम मारहाण :त्यानंतर त्यांनी तक्रारदारांच्या पतीला फोन करून भेटायचे आहे, असे सांगून भेटण्यास बोलावले. तक्रारदार आणि त्यांचे पती ऑफिसमध्ये असताना आरोपी त्या ठिकाणी आले. त्यांनी ग्रुपमधुन मला का काढून टाकले, अशी विचारणा केली. त्यावेळी ग्रुपमध्ये कोणीही कसलेही मॅसेज करत असल्याने ग्रुपच बंद केला असल्याचं सांगितलं, यावरुन संतापलेल्या पाच जणांनी तक्रारदारांना मारहाण केली. त्यांच्या तोंडावर मारहाण केल्याने तक्रारदारांची जीभ कापली गेली आणि ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या जिभेला टाके पडले आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details