महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पत्नीनं ताटात वाढले नाही 'चिकन पीस', पतीनं मुलीच्या डोक्यात घातली वीट; मुलगी गंभीर जखमी - पतीनं मुलीच्या डोक्यात घातली वीट

Pune Crime News : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीनं जेवणात चिकन पीस न वाढल्यानं पतीनं लहान मुलीच्या डोक्यात वीट मारलीय. यात ती चिमुकली मुलगी गंभीर जखमी झालीय. या प्रकरणी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime News
Pune Crime News

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 1, 2023, 10:39 AM IST

Updated : Dec 1, 2023, 2:12 PM IST

पुणे Pune Crime News : पुण्यात कधी काय होईल हे कोणीही सांगू शकत नाही. आजपर्यंत अनेक घरघुती भांडण आपण पाहिले असतील, पण पुण्यातील पाषाण परिसरात एक धक्कादायक घटना घडलीय. पत्नीनं जेवणात चिकन पीस न दिल्यामुळं चिडलेल्या पतीनं लहान मुलीच्या डोक्यावर वीट मारुन तिला गंभीर जखमी केलंय. ही घटना पाषाण इथल्या वाकेश्वर रस्ता परिसरातील पूनम बेकरीजवळ घडलीय. विकास नागनाथ राठोड असं आरोपी पतीचं नाव आहे.

आरोपी पतीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती विकास राठोड सोमवारी रात्री घरी आला तेव्हा त्याला पत्नीनं जेवण दिलं. परंतु जेवणात चिकन पीस नसल्यानं पती विकास चिडला आणि त्यानं चिडून लहान मुलीच्या डोक्यात वीट मारली. त्यात मुलगी गंभीर जखमी झालीय. जखमी मुलीला तत्काळ दवाखान्यात नेण्यात आलं. या प्रकरणी महिलेचे वडील रघुनाथ लाला पवार यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिलीय. त्यावरुन पोलिसांनी आरोपी विकास नागनाथ राठोड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस अधिक तपास करत आहेत. याप्रकरणी अद्याप पोलिसांनी आरोपीला अटक केलेली नाही. यातील मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

"ही घटना दोन दिवसांपूर्वीची आहे. पाषाण येथील वाकेश्वर रस्ता परिसरातील पूनम बेकरीजवळ असलेल्या वस्तीत ही घटना घडली आहे. आरोपी पती हा जेव्हा रात्री जेवायला घरी आला तेव्हा पत्नीनं जेवणात चिकनच दिलं नाही म्हणून आरोपी विकास हा चिडला आणि त्यानं जवळच पडलेली विट त्याच्या मुलीच्या डोक्यात मारली आहे. याबाबत अधिक तपास करत आहोत." - बालाजी पांढरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चतु:शृंगी पोलीस स्टेशन

हेही वाचा :

  1. पार्टी भोवली! पोलीस निरीक्षकाच्या केबिनमध्ये पार्टी करणारे चार पोलीस निलंबित
  2. बनावट व्हिसा असल्यानं सर्बियाच्या इमिग्रेशन अधिकाऱ्यानं केलं हद्दपार, पंजाबी तरुणाविरोधात मुंबईत गुन्हा दाखल
  3. मध्य प्रदेश हादरलं! बाप-मुलानं खून करत मृतदेहाचे केले 400 तुकडे
Last Updated : Dec 1, 2023, 2:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details