पुणे :आईनं पोटच्या मुलीचा गळा दाबून खून केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये घडली आहे. सरिता हरिओम जांगीड असं चिमुकल्या मुलीचा गळा दाबून खून ( Pune Crime ) करणाऱ्या मातेचं नाव आहे. मात्र हा खून का करण्यात आला याबाबतची माहिती अद्याप पुढं आली नाही.
आईनं दाबला मुलीचा गळा :गुरुवारी सायंकाळी सरिता जांगीड यांनी आपल्या लहान मुलीचा गळा दाबून खून केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. सरिता आणि तिच्या मुलीचं शाळेत असताना भांडण झालं होतं. त्यामुळे त्या दोघी एकमेकींना बोलत नव्हत्या. मात्र सायंकाळी चिमुकली मुलगी रागारागानं घराबाहेर जात असल्यानं सरिता यांनी तिला घरात ओढत नेलं. यावेळी सरितानं चिमुकल्या मुलीला घरातील बेडवर बसवलं. मात्र त्यानंतर चिमुकल्या मुलीनं सरिताला धक्का दिल्यानं तिनं चिमुकल्या मुलीला लाथा बुक्क्यानी मारहाण केली. इतकचं नाही, तर तिचा गळा दाबून खून केला.
वडील गेले होते तंबाखू आणायला :शाळेत दोघी मायलेकीचं भांडण झाल्यानं त्या बोलत नसल्याचं हरीओम जांगीड यांनी आपल्या तक्रारीत नमूद केलं आहे. घटना घडली तेव्हा हरीओम जांगीड हे तंबाखू आणायला दुकानात गेले होते. मात्र यावेळी त्यांची दुसरी मुलगी विजयालक्ष्मीनं त्यांना सरिता आणि चिमुकल्या बहिणीचं भांडण झालं असून सरितानं तिचा गळा दाबला आहे. तच्यामुळं ती आता उठत नसल्याचं सांगितलं. ही घटना ऐकताच हरीओम जांगीड यांनी खात्री केली असता, चिमुकली मुलगी निपचित पडल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी पोलीस ठाणे गाठत घटनेची माहिती पोलिसांना दिली.
बहिणीनं सोडवले होते भांडण :सरिता चिमुकल्या मुलीला मारत असताना तिच्या मोठ्या मुलीनं हे भांडण सोडवलं होतं. मात्र ती चिमुकली घरातून बाहेर निघून गेली होती. त्यामुळे सरितानं पुन्हा या चिमुकल्या मुलीला मारहाण केली. पुन्हा सरिता त्या मुलीला मारहाण करत असताना तिनं भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला लाथ मारल्यानं ती दूर पडल्याचं हरीओम जांगीड यांनी पोलिसांना सांगितलं. यात चिमुकल्या मुलीच्या अंगावर बसून चिमुकलीचा गळा दाबल्यानं तिचा मृत्यू झाल्याचं हरीओम जांगीड यांनी आपल्या तक्रारीत नमूद केल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक राऊत यांनी दिली आहे.
हेही वाचा :
- Baramati Crime News : सुपारी देऊन पोटच्या मुलाचा केला खून; वयोवृद्ध मजूर दाम्पत्यासह पाच जणांना अटक