पुणे - शहरात घरफोडी करणाऱ्या ३ आरोपींना जेरबंद करण्यात आले. त्यांच्याकडून तब्बल २३ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्हे शाखेच्या पथकाने रामटेकडी, हडपसर येथे सापळा रचून ही कारवाई केली.
पुण्यात घरफोडी करणारे ३ जण जेरबंद, २३ लाखांचा मुद्देमाल जप्त - रामटेकडी, हडपसर
पुण्यात घरफोडी करणाऱ्या आरोपींकडून ४७ तोळे सोने, ४ किलो चांदी, एक कार, मोटारसायकल तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली हत्यारे असा एकूण २३ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जितसिंग ऊर्फ जितु राजपालसिंग टाक (वय-23), हुकुमसिंग रामसिंग कल्याणी (वय 28), अंगतसिंग अजमेरसिंग कल्याणी (वय 34) असे आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून ४७ तोळे सोने, ४ किलो चांदी, एक कार, मोटारसायकल तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली हत्यारे असा एकूण २३ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांचा साथीदार लखनसिंग रजपुतसिंग दुधाणी हा फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहे.
लखनसिंग याच्या मदतीने पुणे शहरात गेल्या दीड वर्षापासून घरफोडीचे एकूण 27 गुन्हे उघडकीस आले आहे. आरोपी वराहपालन व लोखंडी हत्यारे बनवण्याचा व्यवसाय करत असल्याचे वरकरणी दाखवत होते. मात्र, सर्वजण रात्रीच्यावेळी बंद असलेले फ्लॅट शोधून त्याचे कुलूप तोडत होते. त्याचवेळी शेजारील घराला बाहेरून कडी लावत होते. त्यानंतर घरात घुसून चोरी करीत होते. मुख्य आरोपी जितसिंगच्या विरोधात यापूर्वी एकूण ६ गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.