पुणे: पुणे शहर परिसरात वाहनचोर्या करणार्या सराईताला सिंहगड रोड पोलिसांच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून चोरीच्या 8 दुचाकी जप्त करण्यात आल्या असून सिंहगड रोडSinhagad Road Police , लोणीकंद, सहकारनगर पोलीस ठाण्यातील वाहन चोरीचे 8 गुन्हे उघडकीस आले आहेत. शिवा उर्फ सुमन शंभु चक्रवर्ती (22, रा. वाघोली, मूळ रा. कलकत्ता) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
Pune Crime: शहरात वाहन चोऱ्या करणाऱ्या सराईताला अटक - सिंहगड रोड पोलिस
Pune Crime: पुण्यात वाहनचोर्या करणार्या सराईताला सिंहगड रोड पोलिसांच्या पथकाने Sinhagad Road Police अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या 8 दुचाकी जप्त करण्यात आले असून सिंहगड रोड, लोणीकंद, सहकारनगर पोलीस ठाण्यातील वाहन चोरीचे 8 गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलीस पथकाला मिळाली: शहरातील वाढत्या वाहन चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सिंहगड रोड पोलिसांचे पथक हद्दीत गस्तीवर होते. या दरम्यान सिंहगड रस्ता भागातील प्रयेजा सिटी परिसरात एकजण संशयितरित्या थांबल्याची माहिती पोलीस नाईक अमित बोडरे, अमोल पाटील, सागर शेडगे यांच्यासह पथकाला मिळाली होती. माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम यांच्या पथकाने चक्रवर्ती याला ताब्यात घेतले.
8 दुचाकी जप्त करण्यात आल्या: त्याच्याकडे गाडीच्या कागदपत्रांबाबत विचारणा केली असता, तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. पोलीस खाक्या दाखविताच त्याने सिंहगड रस्त्यावरील मॉलमधून गाडी चोरल्याचे कबूल केले आहे. त्याच्याकडून चोरीच्या एकूण 8 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. विमानतळ, लोणीकंद, सहकारनगर आणि सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील 8 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.