पुणे - मागील वर्षी पुण्यातील कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला झाला होता. या हल्ल्यात बँकेची जवळपास ९४ कोटी इतकी रक्कम लंपास करण्यात आली होती. या घटनेनंतर देशभरात खळबळ माजली होती. याप्रकरणी आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत १८ जणांना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा - दोन आत्मसमर्पित नक्षलवाद्यांवर नक्षलवाद्यांचा गोळीबार ; एक ठार तर एक जखमी
शाबाज मोहम्मद आरिफ उर्फ रेहान अली (वय-३०), आसिफ जमिल शेख (वय-३१) आणि फिरोज यासिन शेख (वय-३७) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. एका गुन्ह्यात ते ठाण्याच्या तुरुंगात जेरबंद होते. त्यांनी इंदोर (मध्यप्रदेश) येथील एटीएममधून ५४ लाख रुपये काढल्याचे कबूल केले. त्यांना प्रोडक्शन वॉरंटने ठाणे मध्यवर्ती कारागृहातून पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.