पुणे -महानगरपालिकेच्या वतीने ओल्या कचऱ्याच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी शहरात विविध प्रकल्प राबवण्यात येत आहेत. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून ओल्या कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी पर्यायी कचरा विघटन प्रकल्पांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी रविवारी या प्रकल्पांची पहाणी केली.
पुण्यात महानगरपालिकेच्या वतीने ओला कचरा व्यवस्थापनासाठी विघटन प्रकल्पांचे प्रदर्शन - management
गेल्या काही वर्षांमध्ये शहरातील कचऱ्याच्या व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे ओला कचरा जिथे निर्माण होतो, तिथेच त्याचे विघटन करून कचऱ्याचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी महानगरपालिकेकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.
गेल्या काही वर्षांमध्ये शहरातील कचऱ्याच्या व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे ओला कचरा जिथे निर्माण होतो, तिथेच त्याचे विघटन करून कचऱ्याचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी महानगरपालिकेकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी कचरा जिरवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देशही गृहनिर्माण संस्थांना देण्यात आले आहेत. अशा प्रकारे सुविधा उपलब्ध करुन देणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना करात सूटही देण्यात आली आहे.
त्याप्रमाणेच महानगरपालिकेनेही यासाठी काही प्रकल्पांची निर्मिती केली आहे. मात्र, शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर कचरा व्यवस्थापनासाठी अधिक प्रभावी उपाययोजनांची गरज आहे. त्यामुळे ओल्या कचऱ्याच्या विघटनासाठी नागरिकांना विविध पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने संभाजी बागेत ओला कचरा व्यवस्थापन पर्यायांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.