महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

स्वदेशी की विदेशी काय घ्यायचं तुम्हीच ठरवा, पुण्यातील ग्राहक पेठेचा प्रयोग - पुणे ग्राहक पेठ न्यूज

ग्राहकांना वस्तू स्वदेशी की विदेशी याची माहिती व्हावी, यासाठी पुण्यातील ग्राहक पेठेने एक नवीन प्रयोग केला आहे. दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानात येणाऱ्या ग्राहकांना कोणत्या वस्तू स्वदेशी आणि कोणत्या वस्तू विदेशी आहेत हे माहीत व्हावे यासाठी प्रत्येक वस्तूच्या खाली स्वदेशी आणि विदेशी या नावाची चिठ्ठी लावली आहे.

Pune Consumer market classified domestic and foreign goods
स्वदेशी की विदेशी काय घ्यायचं तुम्हीच ठरवा

By

Published : Jun 8, 2020, 6:54 PM IST

पुणे - दररोज लागणाऱ्या दैनंदीन जीवनात आपण अनेक वस्तू वापरतो. त्या वापरताना त्यातील स्वदेशी वस्तू कोणत्या आणि विदेशी वस्तू कोणत्या याची आपणाला कल्पना नसते. ग्राहकांना याची माहिती व्हावी, यासाठी पुण्यातील ग्राहक पेठेने एक नवीन प्रयोग केला आहे. दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानात येणाऱ्या ग्राहकांना कोणत्या वस्तू स्वदेशी आणि कोणत्या वस्तू विदेशी आहेत हे माहीत व्हावे यासाठी प्रत्येक वस्तूच्या खाली स्वदेशी आणि विदेशी या नावाची चिठ्ठी लावली आहे.

स्वदेशी की विदेशी काय घ्यायचं तुम्हीच ठरवा, पुण्यातील ग्राहक पेठेचा प्रयोग
याविषयी बोलताना ग्राहक पेठेचे प्रमुख सूर्यकांत पाठक म्हणाले की, ग्राहक पेठ सुरू झाल्यापासून आम्ही कधीच मेड इन चायना, मेड इन इंग्लंड, मेड इन यूएसए वस्तू विकल्या नाहीत. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर व्हा, असे सांगत स्वदेशी मालाचा पुरस्कार केला. त्यातून आम्हाला ही कल्पना सुचली. लोकांना स्वदेशी वस्तू खरेदी करायच्या असतील तर कुठल्या स्वदेशी आणि कुठल्या विदेशी वस्तू आहेत हे कळत नाही. त्यामुळे आमच्या दुकानातील प्रत्येक वस्तुखाली ती स्वदेशी आहे की विदेशी याची माहिती दिली. ग्राहकांना ज्या वस्तू पाहिजे असतील त्या ते घेऊन जातील ही त्यामागची कल्पना आहे. ग्राहकांनी स्वदेशी वस्तूच वापराव्यात याकडे आमचा आगामी काळात कल राहील.

ABOUT THE AUTHOR

...view details