महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नवीन कृषी कायदा, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा, काँग्रेसची पुण्यात निदर्शने - पुणे काँग्रेस आंदोलन न्यूज

पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पुणे शहर काँग्रेसतर्फे नव्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करण्यात आले. 'बळीराजा जगला पाहिजे, ही काँग्रेसची भूमिका आहे. त्यामुळे काँग्रेसने आजवर शेतकऱ्यांना आणि कामगारांना मदत करणारे कायदेच केले. परंतु आता शेतकरी उद्ध्वस्त होत असतानाही भाजपा सरकार काही बोलण्यासाठी तयार नाही. शेतमालाला हमीभाव मिळत नाही, अशी टीका काँग्रेसने केली.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती न्यूज
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती न्यूज

By

Published : Oct 2, 2020, 12:27 PM IST

Updated : Oct 2, 2020, 1:30 PM IST

पुणे -'बळीराजा जगला पाहिजे, ही काँग्रेसची भूमिका आहे. त्यामुळे काँग्रेसने आजवर शेतकऱ्यांना आणि कामगारांना मदत करणारे कायदेच केले. परंतु आता शेतकरी उद्ध्वस्त होत असतानाही भाजपा सरकार काही बोलण्यासाठी तयार नाही. शेतमालाला हमीभाव मिळत नाही. भाजपा सरकारने कृषी उत्पन्न बाजार समिती उद्ध्वस्त करून शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या दावणीला बांधले आहे. नव्याने मंजूर केलेला कृषी कायदा हा शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा आहे,' अशी टीका पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी केले.

नवीन कृषी कायदा, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा - काँग्रेस

हेही वाचा -हाथरसची घटना देशातील लोकशाहीला काळिमा फासणारी - छगन भुजबळ


पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पुणे शहर काँग्रेसतर्फे नव्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. बागवे म्हणाले, 'काँग्रेसने आजवर शेतकऱ्यांना आणि कामगारांना फायदेशीर ठरणारे कायदे केले. परंतु भारतीय जनता पक्षाने केलेला हा कृषी कायदा शेतकरी आणि कामगारांच्या विरोधात आहे. हा कायदा शेतकऱ्यांच्या मुळावर येणारा आहे. भाजपा सरकारने लवकरात लवकर हा जुलमी कायदा मागे घेऊन शेतकरी आणि कामगारांच्या हिताचे कायदे करावेत. जोपर्यंत भाजपा सरकार हा कायदा मागे घेत नाही, तोपर्यंत काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करतच राहील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

हेही वाचा -ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफांशी वाद झालेल्या डीवायएसपीला नागपुरात पदोन्नती

Last Updated : Oct 2, 2020, 1:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details