पुणे - राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांची जागावाटपाबाबतची भुमिका काँग्रेसला अमान्य आहे. पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी चार जागांवर दावा केला आहे. पर्वती हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असून तो काँग्रेसला सोडण्याची मागणी त्यांनी केली आहे.
पुण्यात जागावाटपावरून आघाडीत वादाची ठिणगी; पर्वती मतदार संघावर काँग्रेसचा दावा - pune assembly constituency
पुण्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस 4 तर काँग्रेस 3 जागा लढवणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी या चारही जागांवर दावा केला आहे.
2014 विधानसभा निवडणूक: "काठावर पास" आमदार
पुण्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी पुण्यातील 4 जागा राष्ट्रवादी काँग्रेस तर 3 जागा काँग्रेस लढवणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी अजून एका जागेवर दावा केला आहे. पर्वती मतदारसंघात काँग्रेसला मानणारे मतदार आहेत. हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असल्याचे म्हणत त्यांनी तो काँग्रेसला सोडण्याची मागणी केली आहे.या जागेसाठी काँग्रेस इच्छुक असल्याने आघाडीत बिघडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.