महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'वर्क फ्रॉम होमची सक्ती करताना आयटी कंपन्यांच्या अडचणी लक्षात घेऊन विषय हाताळला जाईल' - वर्क फ्रॉम होम पुणे

महाराष्ट्राचे आयटी हब असलेल्या पुणे शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयटी कँपन्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंग आणण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.

pune collector
नवलकिशोर राम - जिल्हाधिकारी, पुणे

By

Published : Mar 19, 2020, 10:03 PM IST

पुणे - महाराष्ट्राचे आयटी हब असलेल्या पुणे शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयटी कँपन्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंग आणण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. सध्या आयटीमध्ये 'वर्क फॉर्म होम'ची मोठी चर्चा आहे. दरम्यान, वर्क फ्रॉम होमची सक्ती करताना आयटी कंपन्यांच्या अडचणी लक्षात घेऊन संवेदनशीलपणे विषय हाताळला जाईल, असे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी सांगितले.

नवलकिशोर राम - जिल्हाधिकारी, पुणे

प्रशासनाने आयटी कँपन्यांना जास्तीतजास्त वर्क फ्रॉम होमचे पालन व्हावे, अशा सूचना केल्या आहेत. मात्र, आयटी कंपन्यांमध्ये मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढेल, अशी भीती व्यक्त केली जाते. या पार्श्वभूमीवर पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी आयटी कंपन्यांना वर्क फॉर्म ऑफच्या सूचना देत असताना त्यांच्या अडचणीही समजून घेण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. आयटी कंपन्यांना 50 टक्के वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यात वाढ करून 70 टक्के वर्क फ्रॉम होम होऊ शकतात का, याची चाचपणी या कंपन्यांकडून केली जाते आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details