महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे, कोरोना होण्याच्या भीतीने तरुणाची रुग्णालयावरून उडी मारून आत्महत्या - कोरोना भीतीने तरुणाची आत्महत्या

लॉकडाऊन आणि कोरोनाची भीती यामुळे नागरिकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचे हळूहळू समोर येत आहे. बोपोडी येथे एका २५ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार झाला. गुरुवारी दुपारी कोरोना चाचणीसाठी त्याचे वैद्यकीय नमूने घेण्यात आले. त्यानंतर तो तणावात होता.

Suicide
आत्महत्या

By

Published : May 15, 2020, 8:22 AM IST

पुणे -कोरोनाने देशभरात धुमाकूळ घातला आहे. लॉकडाऊन आणि कोरोनाची भीती यामुळे नागरिकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचे हळूहळू समोर येत आहे. कोरोना होण्याच्या भीतीने पुण्याच्या बोपोडी येथे एका २५ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार झाला.

मृत तरुणाला श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे बोपोडीतील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. गुरुवारी दुपारी कोरोना चाचणीसाठी त्याचे वैद्यकीय नमूने घेण्यात आले. त्यानंतर तो तणावात होता. सायंकाळी सातच्या सुमारास लघूशंकेला जायचे, असे सांगून तो बाहेर पडला. काही वेळातच त्याने रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details