पुणे- पुणे दहशतवादी विरोधी पथकाने ( Pune Anti Terrorism Squad ) दापोली परिसरातून एका तरुणाला मंगळवारी (दि. 24 मे) अटक केली. जुनेद मोहम्मद ( वय 28 वर्षे), असे त्या तरुणाचे नाव आहे. हा तरुण जम्मू काश्मीरमधील गजवाते अल हिंद या अतिरेकी संघटनेच्या संपर्कात होता. या अतिरेकी संघटनेकडून या तरुणाला पैसे पुरवण्यात आले, असा आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे.
मूळचा खामगाव (जि. बुलडाणा) असलेला जुनेद हा सोशल मिडीयाच्या माध्यमातून या संघटनेच्या संपर्कात आला होता. गझवाते अल हिंद या काश्मीरमधील अतिरेकी संघटनेने महिनाभरापूर्वीच या तरुणाच्या बँक खात्यात दहा हजार रुपये जमा केले होते. तरुणाला पैसे नेमके का पाठवण्यात आले ? तो या पैशाचे काय करणार होता ? हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र, दहशतवादी कृत्यांसाठीच हे फंडिग करण्यात आल्याचा एटीएसचा आरोप आहे. संशयीतास पुणे न्यायालयात दुपारी हजर करण्यात येणार आहे.