बारामती (पुणे) - मुंबईहून बारामती तालुक्यातील मूर्टी गावाला परतलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मूर्टीसह आजूबाजूचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. याशिवाय ग्रामस्थांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, तसेच योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले आहे.
मूर्टी गावातील एक व्यक्ती मागील काही दिवसांपासून मुंबईत वास्तवाला होती. ती काही दिवसांपूर्वीच मूर्टी गावी परतली होती. गावी परतल्यानंतर त्याला सर्दी खोकल्याचा त्रास जाणवू लागला. तेव्हा त्याची गावातच तपासणी करण्यात आली. पण निदान झाले नाही. यामुळे त्याची मोरगाव येथे पुन्हा तपासणी करण्यात आली. यात त्याला कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले.