महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे विमानतळावर प्रवाशांची लगबग, ३७२ प्रवाशांना घेऊन ३ विमानांचे उड्डाण - पुणे विमानतळ सेवा

पुणे विमानतळ आजपासून सुरू झाले असून, सकाळपासूनच कलकत्ता, कोचीन आणि चेन्नई येथील ३७२ प्रवाशांना घेऊन ३ विमांनानी उड्डाण केले. तर दिल्लीतून आलेल्या दोन विमानातून १५८ प्रवाशी पुण्यात दाखल झाले आहेत.

Pune Airport starting from today
पुणे विमानतळावर प्रवाशांची लगबग

By

Published : May 25, 2020, 8:54 PM IST

पुणे - मार्च महिन्यांपासून बंद असलेली विमानसेवा आजपासून (रविवार) सुरू झाली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक विमानतळांवर सध्या प्रवाशांची लगबग सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. पुणे विमानतळही आजपासून सुरू झाले असून, सकाळपासूनच कलकत्ता, कोचीन आणि चेन्नई येथील ३७२ प्रवाशांना घेऊन ३ विमांनानी उड्डाण केले. तर दिल्लीतून आलेल्या दोन विमानातून १५८ प्रवाशी पुण्यात दाखल झाले आहेत.

पुणे विमानतळ आजपासून सुरू
केंद्र सरकारच्या देशांतर्गत विमानसेवेच्या घोषणेनंतर विमानतळ प्राधिकरणाने विमान उड्डाणाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार पुण्यातून १७ उड्डाणे होणार आहेत. दिल्ली, बंगळूर, अहमदाबाद, कोची, चेन्नई, कलकत्ता आणि हैदराबाद याठिकाणी ही उड्डाणे होणार आहेत. त्यानुसार आज सकाळपासून पुणे विमानतळावर लगबग सुरू आहे. याठिकाणी कोरोनाच्या अनुषंगाने घालून दिलेल्या नियमांचेही पालन करण्यात येत आहे. फिजिकल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझर याचा वापर करावा, यासाठी प्रवाशांना माहिती दिली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details