महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे 'एअर फोर्स'च्या विद्यार्थ्यांनी निरोप समारंभासाठीची ३० हजार रक्कम दिली 'पीएम केअर' फंडाला - पुणे एअर फोर्स

देशभरात कोरोनाचे रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाची लढाई लढण्यासाठी प्रत्येकजण आपआपल्यापरीने मदत करत आहेत. कोणी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करत आहे, तर कोणी गावे निर्जंतुकीकरण करण्यासाठी पुढाकार घेत आहे. पोलीस बांधव स्वतः पुढाकार घेत गावांचे निर्जंतुकीकरण करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

pm care fund  pune air force  पुणे एअर फोर्स  पीएम केअर फंड
पुणे एअर फोर्सच्या विध्यार्थ्यांनी निरोप समारंभासाठीची ३० हजार रक्कम दिली पीएम केअर फंडाला

By

Published : Apr 30, 2020, 8:59 AM IST

पुणे- सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदींनी देशातील दानशूर व्यक्तींना मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार शहरातील 'एअर फोर्स'च्या विद्यार्थ्यांनी निरोप समारंभासाठी जमा केलेली ३० हजार रुपये रक्कम पीएम केअर फंडला मदत म्हणून दिली आहे.

पुणे एअर फोर्सच्या विध्यार्थ्यांनी निरोप समारंभासाठीची ३० हजार रक्कम दिली पीएम केअर फंडाला

देशभरात कोरोनाचे रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाची लढाई लढण्यासाठी प्रत्येकजण आपआपल्यापरीने मदत करत आहेत. कोणी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करत आहे, तर कोणी गावे निर्जंतुकीकरण करण्यासाठी पुढाकार घेत आहे. पोलीस बांधव स्वतः पुढाकार घेत गावांचे निर्जंतुकीकरण करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच अनेकजण वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पीपीई किटचे वाटप करत आहेत. मदतीसाठी पुणे एअर फोर्समधील एनसीसीचे विद्यार्थी देखील सरसावले आहेत. त्यांनी निरोप समारंभासाठी ३० हजार रुपये जमा केले होते. मात्र, कोरोना आला आणि शाळा, महाविद्यालयांना सुट्ट्या मिळाल्या. तसेच लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे निरोप समारंभाचा कार्यक्रम करणे शक्य नाही. त्यातच पंतप्रधानांनी मदतीसाठी आवाहन केले. त्यामुळे शिराळा येथील नगराध्यक्षा अर्चना शेटे यांचा मुलगा शिवमने पुढाकार घेत ही रक्कम पीएम केअर फंडमध्ये जमा केली. यासाठी विंग कमांडर विक्रम त्यागरमण व सार्जंट त्रिपाठी यांचे मार्गदर्शन लाभले. यासाठी सीनियर अंडर ऑफिसर साक्षी अत्री, अंडर ऑफसर हितेश सोनटक्के यांचे सहकार्य लाभले.

ABOUT THE AUTHOR

...view details