महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...म्हणून लोणार सरोवराचे पाणी झाले गुलाबी - लोणार सरोवरातील पाणी रंगबदलामागचे कारण

हिरव्या रंगाचे लोणार सरोवर जूनच्या पहिल्या आठवड्यात एकाएकी गुलाबी झाल्यानंतर सर्व स्तरातून आश्‍चर्य व्यक्त करण्यात आले होते. हा परिणाम नैसर्गिक आहे की मानवनिर्मित, याचे कारण शोधण्यासाठी वन विभागातर्फे पुण्यातील एआरआय आणि नागपूर येथील निरी या संस्थेला पाण्याचे नमुने विश्लेषणासाठी देण्यात आले होते. एआरआयने नुकताच या नमुन्याच्या विश्लेषणाचा अहवाल वन विभागाला सादर केला आहे.

water color change of lonar lake  why lonar lake water color change  lonar lake water color scientific reason  लोणार सरोवरातील पाण्याचा रंग का बदलला  लोणार सरोवरातील पाण्याचा रंगबदल  लोणार सरोवरातील पाणी रंगबदलामागचे कारण  लोणार सरोवराबाबत एआरआयचा अहवाल
...म्हणून लोणार सरोवराचे पाणी गुलाबी, पुण्यातील आघारकर संशोधन संस्थेचा अहवाल

By

Published : Jul 21, 2020, 7:59 PM IST

Updated : Jul 21, 2020, 8:57 PM IST

पुणे -जून महिन्यात बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराच्या पाण्याचा रंग गुलाबी झाला होता. पाण्याचा रंग का बदलला? यामागचे रहस्य आता उलगडले आहे. पुण्यातील आघारकर संशोधन संस्थेने (एआरआय) केलेल्या विश्लेषणातून सरोवराच्या पाण्याचा रंग बदलण्यामागचे कारण पाण्यातील हॅलोआर्किया हे जिवाणू असल्याचे निष्पन्न झाले आहे. एआरआयने विश्लेषणाचा अहवाल नुकताच वनविभागाला पाठवला आहे.

लोणार सरोवराच्या पाण्याचा रंग का बदलला? याबाबत माहिती देताना आघारकर संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञ डॉ. मोनाली रहाळकर

बुलडाणा जिल्ह्यातील लोणार येथे खाऱ्या पाण्याचे जगातील तिसरे व देशातील एकमेव सरोवर आहे. याची निर्मिती एका उल्कापातामुळे झाली. या सरोवराचे पाणी खारे असून त्याचा रंग हिरवा आहे. मात्र, हिरव्या रंगाचे लोणार सरोवर जूनच्या पहिल्या आठवड्यात एकाएकी गुलाबी झाल्यानंतर सर्व स्तरातून आश्‍चर्य व्यक्त करण्यात आले होते. हा परिणाम नैसर्गिक आहे की मानवनिर्मित, याचे कारण शोधण्यासाठी वन विभागातर्फे पुण्यातील एआरआय आणि नागपूर येथील निरी या संस्थेला पाण्याचे नमुने विश्लेषणासाठी देण्यात आले होते. एआरआयने नुकताच या नमुन्याच्या विश्लेषणाचा अहवाल वन विभागाला सादर केला आहे. उन्हाळ्यात लोणार सरोवराच्या पाण्यातील हॅलोआर्किया जिवाणूंची संख्या एकाकी वाढल्यामुळे सरोवराच्या पाण्याचा रंग गुलाबी झाला होता. सूर्य प्रकाशाच्या सहाय्याने या जीवाणूंची चयापचय क्रिया सुरू असताना गुलाबी रंगद्रव्य तयार होत असतात. हे जिवाणू लोणारच्या पाण्यात आधीपासूनच अस्तित्वात आहेत. मात्र, पूर्व मोसमी पावसाअभावी यंदा उन्हाळ्यात सरोवराच्या पाण्यात क्षारता वाढली. त्यात लॉकडाऊनमुळे कोणताही मानवी अडथळा नव्हता. अशा स्थितीत सरोवराच्या पृष्ठभागावर हॅलोआर्कियाचे प्रमाण वाढत गेले आणि सरोवराच्या पाण्याचा रंग काही काळासाठी गुलाबी झाला, अशी माहिती डॉक्टर मोनाली रहाळकर यांनी दिली.

२० मायक्रोमीटर असलेला हॅलोआर्किया

दरम्यान, जूनपासून झालेल्या पावसामुळे सरोवराची स्थिती पूर्ववत झाल्याचे अभ्यासक सांगत आहेत. तसेच फ्लेमिंगोच्या पंखामध्ये गुलाबी रंग असतो. त्यामुळे पाण्याचा रंग बदलत असतो. या सरोवरावर दोनवेळा फ्लेमिंगो येऊन गेले. मात्र, येथील पाण्यातच हॅलोआर्किया असल्याचे दिसून आले. तरीसुद्धा फ्लेमिंगोच्या पार्श्वभूमीवर देखील पुढे अभ्यास करणार असल्याचे डॉ. राहाळकर यांनी सांगितले. लोणारच्या पाण्याचा अभ्यास करताना डॉ. कार्तिक बालसुब्रमण्यम, डॉ. सुमित डागर आणि डॉ. मोनाली रहाळकर या शास्त्रज्ञांचा सहभाग होता.

संशोधनासाठी घेतलेले पाण्याचे नमुने
Last Updated : Jul 21, 2020, 8:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details