महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे पुन्हा लॉकडाऊन; अनेक ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त - pune corona and lockdown

लॉकडाऊन कालावधीत ऑनलाइन पास नसणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येत आहे. यासाठी पोलिसांनी चौका-चौकात बॅरिकेट्स लावले आहेत. तसेच नाकाबंदीही करण्यात आली आहे.

pune again lockdown for 10 days, police forced posted in various places in city
पुणे पुन्हा 10 दिवसांसाठी लॉकडाऊन; अनेक ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त

By

Published : Jul 14, 2020, 11:10 AM IST

Updated : Jul 14, 2020, 12:31 PM IST

पुणे -शहरात आज (मंगळवारी) सकाळपासूनच लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. शहरातील चौकाचौकात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच विनाकारण आणि परवानगी नसलेल्या नागरिकांवर सकाळपासूनच कारवाईला सुरुवात झाली आहे.

तर ऑनलाइन पास नसणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येत आहे. यासाठी पोलिसांनी चौका-चौकात बॅरिकेट्स लावले आहेत. तसेच नाकाबंदीही करण्यात आली आहे. या कालावधीत रस्त्यावर फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच परवानगी देण्यात येत आहे.

हेही वाचा -पुण्यात कोचिंग क्लासच्या शिक्षकाचा विद्यार्थिनीवर बलात्कार

Last Updated : Jul 14, 2020, 12:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details