महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Congress Agitation Pune: राहुल गांधींसाठी काँग्रेसपक्ष मैदानात, पुण्यात आंदोलन - Protest in Pune by Congress

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर भाजप सरकारच्या दबावाखाली गुजरातमध्ये मानहानीचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा कॉंग्रेसचा दावा आहे. याच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर चौक येथे आंदोलन करण्यात आले आहे.

Congress Agitation Pune
काँग्रेसकडून पुण्यात आंदोलन

By

Published : Jul 8, 2023, 4:23 PM IST

राहुल गांधींच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेले कॉंग्रेस कार्यकर्ते

पुणे :कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा लोकसभेत परतण्याचा मार्ग आता कठीण झाला आहे. गुजरात उच्च न्यायालयाने गुरुवारी मोदी आडनावाच्या टिप्पणीवरून मानहानीच्या खटल्यात त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याची विनंती नाकारली आहे.

राहुल गांधी थांबणार नाहीत :पुण्यातील आंदोलनाच्यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, आमचे नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत जेव्हा अदानी आणि मोदी यांनी जे भ्रष्टाचार केले, ते पुराव्यासहित सादर केले. तेव्हापासून मोदी सरकार त्यांच्या मागे लागले आहे. कोर्टाने निकाल दिला आहे तो पाहिला तर, 70 वर्षांच्या इतिहासात कधीही एवढी मोठी शिक्षा झाली नाही. हे फक्त राहुल गांधी यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी केले गेले आहे. पण राहुल गांधी हे थांबणार नाहीत ते लोकांच्या समोर सत्य सांगणार, असे देखील यावेळी अरविंद शिंदे म्हणाले.



राहुल गांधींची फेरविचार याचिका फेटाळली : राहुल गांधींच्या मानहानीच्या खटल्याची शुक्रवारी गुजरात उच्च न्यायालयात सुनावणी झाली. याप्रकरणी हायकोर्टात झालेल्या सुनावणीनंतर राहुल गांधींच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. या निर्णयाला राहुल गांधी यांचे वकील सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असले तरी गुजरात उच्च न्यायालयाने फेरविचार याचिका फेटाळून लावली. राहुल गांधी यांची याचिका न्यायमूर्ती हेमंत प्रचारक यांनी फेटाळून लावली.

हायकोर्ट ढवळाढवळ करणार नाही : कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निकाल पूर्णपणे योग्य आहे. कारण गुजरात हायकोर्टाला यात ढवळाढवळ करणे योग्य वाटत नाही. असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले. मोदी आडनाव वक्तव्यावरून झालेल्या मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधींना गुजरात उच्च न्यायालयाकडून मोठा झटका मिळाला आहे. मानहानीच्या खटल्यातील शिक्षेला स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला. याबाबत राहुल गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

... तर पावसाळी अधिवेशनात सहभाग घेता येणार नाही : ईटीव्ही भारतशी बोलताना ज्येष्ठ वकील दिनेश द्विवेदी म्हणाले की, उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत राहुल गांधी यांनी तात्काळ सर्वोच्च न्यायालयात जावे. ही शिक्षा न्याय्य, योग्य आणि कायदेशीर असल्याचे गुजरात उच्च न्यायालयाने म्हटले होते. राहुल गांधींच्या शिक्षेवर स्थगिती न मिळाल्यास, 20 जुलैपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात त्यांची संसदेत हजरी लावण्याची शक्यता नाही. तसेच या खटल्यातील त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्यास राहुल गांधी पुढील वर्षीची निवडणूकही लढवू शकणार नाहीत.

हेही वाचा:

  1. Prakash Ambedkar On Rahul Gandhi : खासदारकी रद्द प्रकरणी राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाशिवाय पर्याय नाही - प्रकाश आंबेडकर
  2. Rahul Gandhi Defamation Case : राहुल गांधींसाठी कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार, पुन्हा खासदारकीसाठी काय आहेत कायदेशीर पर्याय...
  3. Rahul Gandhi Defamation Case: गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळली राहुल गांधींची पुनर्विचार याचिका, खासदारकी रद्दच!

ABOUT THE AUTHOR

...view details