संजय राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावरून बारामतीत शिवप्रेमी संघटनांची आंदोलने - बारामतीत शिवप्रेमी संघटनांचे आंदोलन
राज्यभर शिवप्रेमी संघटनांनी खासदार संजय राऊत, नरेंद्र मोदींवरील वादग्रस्त पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल आणि कॅबीनेटमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलने सुरू आहेत. बारामती शहरातील भिगवण चौकात देखील शिवप्रेमी संघटनांनी एकत्र येत घोषणाबाजी करत पोस्टर जाळून आंदोलन केले.
पुणे -छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना पुरावे मागण्यावरुन राजकारण भलतेच तापले आहे. संजय राऊत यांनी शिवाजी महाराजांच्या वंशजांवर वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याचाच निषेध म्हणून राज्यभर शिवप्रेमी संघटनांनी खासदार संजय राऊत, नरेंद्र मोदींवरील वादग्रस्त पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल आणि कॅबीनेटमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलने सुरू केली आहेत. बारामती शहरातील भिगवण चौकात देखील शिवप्रेमी संघटनांनी एकत्र येत घोषणाबाजी करत पोस्टर जाळून आंदोलन केले.