पुणे- हिंजवडीतील आयटी हब येथे सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला असून 4 पीडित तरुणींची सुटका करण्यात आली आहे. गुन्हे शाखा युनिट 4 च्या पथकाने ही कारवाई केली. लॉकडाऊन असल्याने व्हाट्सऍपवर तरुणींचे फोटो पाठवून ग्राहकांना आकर्षित करण्याचे काम केले जात होते.
आयटी हब हिंजवडी येथे चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; व्हाँट्सएपच्या माध्यमातून सुरू होती देहविक्री - prostitution racket pune latest news
हिंजवडीमधील फेज एक येथील हॉटेल ग्रँड मन्नत येथे काही तरुणींकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करवून घेतला जात होता. व्हाट्सऍपवरून ग्राहकांना मुलींचे फोटो पाठवले जात असत आणि सौदा झाल्यानंतर त्या मुलींना या संबंधित हॉटेलमध्ये वेश्या व्यवसायासाठी आणले जात होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट 4 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे यांना माहिती मिळाली होती की, हिंजवडीमधील फेज एक येथील हॉटेल ग्रँड मन्नत येथे काही तरुणींकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करवून घेतला जात आहे. व्हाट्सऍपवरून ग्राहकांना मुलींचे फोटो पाठवले जात असत आणि सौदा झाल्यानंतर त्या मुलींना या संबंधित हॉटेलमध्ये वेश्या व्यवसायासाठी आणले जात होते.
त्यानुसार पोलिसांनी संबंधित व्यक्तीच्या व्हाट्सऍप नंबरवर एक बनावट ग्राहक पाठवला आणि सर्व खात्री झाल्यानंतर हॉटेल ग्रँड मन्नत वर छापा टाकत डांबून ठेवलेल्या 4 पीडित तरुणींची सुटका केली. तसेच, हॉटेल मॅनेजरसह चार जणांवर गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.