महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Prostitution Exposed : बारामती शहरातील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश - Sub Divisional Police Officer Ganesh Ingle

बारामती शहरातील हरिकृपानगर येथील एका फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित दोन महिलांचीही सुटका करण्यात आली.

Prostitution Exposed
Prostitution Exposed

By

Published : May 20, 2023, 9:47 PM IST

बारामती : शहरातील हरिकृपानगर येथील एका फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. युवराज रोहिदास बेंद्रे, शांतीलाल शिवाजी बेंद्रे (रा. कर्जत, जिल्हा अहमदनगर) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यात असलेल्या दोन महिलांची पोलिसांनी सुखरुप सुटका केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी अशी केली कारवाई : हरिकृपा नगर येथील एका अपार्टमेंट ब्लॉकमध्ये हा व्यवसाय केला जात होता. याबाबतची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांना मिळाली होती. त्यांनी साध्या गणवेशातील त्यांच्या अधिकाऱ्यांसह घटनास्थळी धाड टाकत ही कारवाई केली आहे. त्यांनी आगोदर पोलिसांच्या निर्भया टीमला शहर पोलिस ठाण्यात पाठवले. पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांना माहिती देऊन कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार महाडिक यांच्यासह उपनिरीक्षक संध्याराणी देशमुख, सपोनि प्रकाश वाघमारे, कर्मचारी अक्षय सिताफ, कल्याण खांडेकर, दशरथ जामदार आदींनी तेथे बोगस ग्राहक पाठवले. न्यायाधीशांना बोलावण्यात आले. बोगस ग्राहक त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याने आरोपींशी संपर्क साधला. त्यांनी वेश्याव्यवसायासाठी महिला पुरविण्याचे मान्य केले.

आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल : यावेळी बोगस ग्राहकाने मिस्ड कॉल करून पोलिसांना अलर्ट केल्यानंतर छापा टाकण्यात आला. या कारवाईत बोंद्रे यांच्यासह दोन महिलांना ताब्यात घेऊन शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. घटनास्थळी झडती घेतली असता त्यांच्याकडून ६ हजार ९०० रुपये जप्त करण्यात आले. तसेच ५ लाख रुपये किमतीचे मोबाईल जप्त करण्यात आले. 30 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपींविरुद्ध अनैतिक वाहतूक कायदा आणि भारतीय दंड संहिता अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details