महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यात विसर्जन मिरवणुकीचा उत्साह शिगेला; न्यायालयाचा आदेश झुगारून पुण्यात डिजेचा दणदणाट - गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला होणार सुरुवात

पाचही मानाच्या गणपतींच्या विसर्जनानंतर आता पुढील मिरवणुकीला सुरुवात झाली. लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता आणि टिळक रस्त्यावरील बहुतांश मंडळांनी न्यायालयाचा आदेश झुगारून डिजे लावला आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे.

यालयाचा आदेश झुगारून पुण्यात सर्रास डिजे

By

Published : Sep 12, 2019, 10:51 AM IST

Updated : Sep 12, 2019, 10:48 PM IST

पुणे -विसर्जन मिरवणुकीचा उत्साह शिगेला पोहचला आहे. पाचही मानाच्या गणपतींच्या विसर्जनानंतर आता पुढील मिरवणुकीला सुरवात झाली. लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता आणि टिळक रस्त्यावरील बहुतांश मंडळांनी न्यायालयाचा आदेश झुगारून डिजे लावला आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे.

न्यायालयाचा आदेश झुगारून पुण्यात सर्रास डिजे

मानाचा चौथा तुळशीबाग गणपती आणि मानाचा पाचवा केसरीवाडा गणपतीचेही पांचाळेश्वर घाटावर कृत्रिम हौदात विसर्जन झाले. सकाळी साडेदहा वाजता या गणपतींच्या मिरवणुकीला सुरुवात झाली होती. त्यानंतर सायंकाळी 6:30 मिनिटांनी या मानाच्या गणपतींची मिरवणूक संपली.मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती, मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीलच आणि मानाचा पहिला कसबा गणपतीचे मुठा नदीच्या नटेश्वर घाटावर कृत्रिम हौदात विसर्जन झाले. सकाळी 10.30 वाजता या मिरवणुकीला सुरवात झाली होती.

. सकाळी साडेदहा वाजता कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली होती.
मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपतीचे नटेश्वर घाटावर कृत्रिम हौदात विसर्जन.
मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीचे पांचाळेश्वर घाटावर विसर्जन.
मानाचा पाचवा केसरीवाडा गणपतीचेही पांचाळेश्वर घाटावर कृत्रिम हौदात विसर्जन झाले

मानाच्या पहिला कसबा गणपती समोरील ढोल पथकात अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि श्रुती मराठे यांचा सहभाग

पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट तसेच इतर लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत कसबा गणपतीच्या बाप्पाची आरती करण्यात आली. त्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. मानाचा पहिला कसबा गणपती बाप्पाची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली आहे. पालखीच्या पुढे नगारा, वादक, बँड पथक, ढोल पथक अशा दिमाखात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. गणपतीनंतर मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या बाप्पाची मिरवणूक पालखीतून काढण्यात आली असून, मुलं घोड्यावर स्वार झाली आहेत.

ढोल पथकात अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि श्रुती मराठे यांचा सहभाग

मानाचा तिसरा गुरुजी तालीम मंडळाच्या बाप्पासमोर नाचणारी बेधुंद तरुणाई गुलालाची उधळण करत आहे. जोशपूर्ण वातावरणात मानाचा तिसरा गुरुजी तालीम मंडळाच्या गणपतीची मिरवणूक सुरू झाले आहे. फुलांनी सजवलेल्या भव्य अशा मयूर रथावर गुरुजी तालीम मंडळाचा बाप्पा विराजमान आहे. त्यापाठोपाठ मानाचा चौथा तुळशीबाग मंडळाच्या गणपतीची भव्य मूर्ती विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाली आहे. मानाचा पाचवा केसरीवाडा गणपतीची देखील मिरवणूक सुरू झाली आहे.दहा दिवसांच्या उत्साही वातावरणानंतर आता गणरायाला निरोप देण्याची वेळ झाली आहे. पुण्यामध्ये गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. पहिल्या मानाच्या ५ गणपतींच्या पूजनाने मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.

गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

मंडईतल्या टिळक पुतळ्यापासून गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. पुण्याची विसर्जन मिरवणूक ही संपूर्ण महाराष्ट्रात नाहीतर देशात प्रसिद्ध आहे. मानाच्या पहिल्या पाच गणपतींच्या पूजनाने या मिरवणुकीला सुरुवात झाली. मानाचा पहिला कसबा गणपती त्यानंतर इतर मानाचे गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतात.

Last Updated : Sep 12, 2019, 10:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details