पुणे :गेल्या काही दिवसांपासून महामार्गावरील अपघातांमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. पुणे सोलापूर महामार्गावर असणाऱ्या दौंड तालुक्यातील भांडगाव येथे एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात एक खाजगी प्रवासी बस पलटी झाली. या अपघातात १० प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर महामार्गावर काही वेळ मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी आहे. हा अपघात सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडला. तातडीने प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. जखमींना रूग्णालयात हलविण्यात आले.
जखमी प्रवासी : हा अपघात घडला त्यावेळी बसमध्ये एकूण ३८ प्रवासी प्रवास करीत होते. जखमी झालेल्या दहा प्रवाशांमध्ये चार जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात राहुल गंगाधर तरटे (रा. नर्सीगरोड नांदेड), नेहारीका नागनाथ हांडे, शंकुतला दिंगबर वाळके, साक्षी नागनाथ हांडे (तिंन्ही रा.देहु आळंदी पुणे), विग्नेश रमेश गकुला (रा.उमरगा जि.धाराधीव), पुष्पराज हनुमंतराव पाटील (रा. गुरूनिवास श्रीनगर नरसिंगरोड ता.मुखेड जि.नांदेड), ऐरना जठार गुमेरला (रा.चेंगल ता.विमगल जि.निजामबाद) हे जखमी झाले आहेत. माणिकेम मुतीराज जकाला, मुनीराज मुताबा जकाला दोन्ही मुंबईमधील रहिवाशी आहेत. सुलोचना कृष्णा रेड्डी (रा.उपरमाल्याना ता.गंगाधरा जि.करीमनगर) हे जखमी झाले आहेत.