पुणे - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. आयटी कर्मचाऱ्यांना 'वर्क फॉर्म होम' सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यातून अनेक विद्यार्थी आणि नागरिक गावाकडे जात आहेत. अचानक गावाकडे जाणाऱ्यांची संख्या वाढल्याने खासगी प्रवासी वाहतूकदारांनी दरवाढ केली आहे.
खासगी बस कंपन्यांनी 10 ते 15 टक्क्यांपर्यंत दरवाढ केली आहे. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र, ही दरवाढ शिवशाहीसारख्या सरकारी बसच्या तुलनेत कमीच असल्याचे बस व्यावसायिक सांगत आहेत. वाढत्या डिझेलच्या दरांमुळेही काही प्रमाणात दरवाढ झाल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.