महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर खासगी बसला अपघात; दोन प्रवासी गंभीर जखमी - पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग अपघात

गेल्या काही दिवसात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये खासगी बसच्या अपघातांची संख्या जास्त आहे. आज पहाटे पुण्याच्या चाकण येथून वसई-विरारला निघालेल्या बसला अपघात झाला.

bus
बस

By

Published : Jan 10, 2021, 10:15 AM IST

पुणे: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर पहाटे एका खासगी बसला अपघात झाला. बस चालकाने समोर जाणाऱ्या वाहनाला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला. यात घटनेत प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. आज (रविवार) पहाटे साडे तीनच्या सुमारास पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावर बोरघाटात हा अपघात झाला. बसमध्ये एकूण 49 प्रवासी होते त्या पैकी दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर खासगी बसला अपघात झाला

बस चालकाने मागून दिली धडक -

वैभव ट्रॅव्हल्सची बस पुण्याच्या चाकण येथून वसई-विरार इथे निघाली होती. पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावरून ही बस जात होती. मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर बोरघाटात बसचालकाने समोर जाणाऱ्या वाहनाला पाठीमागून धडक दिली. यानंतर जखमींना तातडीने पवना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details