पुणे - अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेले वक्तव्य हे बेजबाबदारपणाचे आहे. सरकारचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी ओला-उबरचे नाव पुढे केले जात आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. त्या जबाबदार व्यक्ती असून त्यांच्याकडून अशा वक्तव्याची अपेक्षा नव्हती असेही चव्हाण म्हणाले.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषद बोलत होते. यावेळी आघाडीच्या जगावाटपावर त्यांनी भाष्य केले. 125-125 फॉर्म्युला असल्याची चर्चा सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा -लोकसभा लढवणार नाही, विधानसभा निवडणूक कराड दक्षिणेतूनच - पृथ्वीराज चव्हाण
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेले वक्तव्य हे बेजबाबदार आहे. ते त्यांच्याकडून अपेक्षित नव्हते. यापुढील पाऊल काय आहे हे तुम्ही ऑटो इंडस्ट्रीजला सांगितले पाहिजे. तुमचा नाकार्तेपणा झाकण्यासाठी ओला उबरचे नाव घेत आहात, अशी टीका सरकारवर त्यांनी केली आहे.
हेही वाचा - भाजपवासी झालेल्या उदयनराजेंचा काँग्रेस-राष्ट्रवादीला सल्ला, आत्मचिंतन-आत्मपरीक्षण करावे
पुढे ते म्हणाले की, २६७ कार शोरूम्स बंद पडले आहेत. पुणे आणि मुंबई येथील शंभरच्या वर शोरूम्स गाड्यांची विक्री होत नसल्याने बंद आहेत. लोक रडायला लागली आहेत. बँकेचे कर्ज मिळत नाही. यावर्षी बँकांचे ७३ हजार कोटींचे घोटाळे झाले आहेत, असा अहवाल रिझर्व्ह बँकेने गेल्या आठवड्यात सांगितला आहे. त्यातील नव्वद टक्के घोटाळा हा राष्ट्रीयकृत बँकांत झाला आहे. कोण चालवत आहे राष्ट्रीयीकृत बँका? असा सवाल करत २०१४ ला मोदी सरकार आले तेव्हा एकूण वर्षीय घोटाळ्याची रक्कम १० हजार कोटी होती. आता ही रक्कम सात पट वाढून ७३ हजार कोटी झाली आहे. आम्हाला या चोरांची नावे द्या, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
हेही वाचा -शिवसेना प्रवेशानंतर प्रदीप शर्मा यांचे विरारमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन