पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (मंगळवारी) रात्री पुणे शहरात मुक्कामी राहणार आहेत. बऱ्याच कालावधीनंतर नरेंद्र मोदी हे एखाद्या ठिकाणी मुक्कामी राहणार आहेत. त्यामुळे शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सोमवारी रात्री पोलिसांनी यासंदर्भात सरावही करून घेतला आहे. बुधवारी सकाळी त्यांची अकलूजमध्ये प्रचारसभा होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज पुण्यात मुक्काम, सुरक्षा व्यवस्था कडेकोट - solapur
नरेंद्र मोदी एखाद्या शहरात कार्यक्रमानिमित्त गेल्यानंतर कार्यक्रम संपताच दिल्लीला परत जातात. पण आज ते पुण्यात मुक्कामी राहणार आहेत. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ते प्रवास करणाऱ्या मार्गावर आणि राजभवन परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाजवळ असणाऱ्या राजभवन येथे त्यांचा मुक्काम असणार आहे. आज (मंगळवारी) रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ते पुण्यात येणार आहेत. त्यानंतर ते पुणे विमानतळ ते राजभवन हा प्रवास करतील. त्यामुळे या मार्गावर चोख बंदोबस्त असणार आहे. नरेंद्र मोदी एखाद्या शहरात कार्यक्रमानिमित्त गेल्यानंतर कार्यक्रम संपताच दिल्लीला परत जातात. पण आज ते पुण्यात मुक्कामी राहणार आहेत. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ते प्रवास करणाऱ्या मार्गावर आणि राजभवन परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दरम्यान राजभवन येथील मुक्काम संपल्यानंतर ते बुधवारी सकाळी राजभवन येथून पुणे विमानतळावर जातील आणि तेथून हेलिकॉप्टरने अकलूजला जाणार आहेत. अकलूज येथील सभा संपल्यानंतर ते हेलिकॉप्टरने पुणे विमातळावर येतील आणि पुढील कार्यक्रमासाठी विमानाने रवाना होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.