पुणे -पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi Dehu Visit ) आज ( मंगळवारी ) देहू येथील संत तुकाराम महाराज यांच्या मूर्ती आणि शिळा मंदिराचे लोकार्पण सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे काम ( Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Marg ) 4 टप्पात तर संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे ( Sant Tukaram Maharaj Palkhi Marg ) काम 3 टप्प्यात पूर्ण होणार, अशी घोषणा केली आहे. यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले, मला आज शिळा मंदिराच्या लोकार्पण कार्यक्रमाला बोलावले हे माझे भाग्य आहे. या फक्त शिळा नाही तर भक्ती आणि ज्ञानाचे केंद्र आहे, असे यावेळी पंतप्रधान म्हणाले.
PM Modi Dehu Visit : संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गाचे काम लवकरच पूर्ण होणार - पंतप्रधान - संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचा 4 टप्पात पूर्ण
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे काम ( Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Marg ) 4 टप्पात तर संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे ( Sant Tukaram Maharaj Palkhi Marg ) काम 3 टप्प्यात पूर्ण होणार, अशी घोषणा केली आहे. यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले, मला आज शिळा मंदिराच्या लोकार्पण कार्यक्रमाला बोलावले हे माझे भाग्य आहे. या फक्त शिळा नाही तर भक्ती आणि ज्ञानाचे केंद्र आहे, असे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) म्हणाले.
काही दिवसांपूर्वी पालखी मार्गाच्या फोर लेन उद्घाटन करण्याचा मान मिळाला. तीन चरणात काम पूर्ण होईल. 350 किमी पेक्षा जास्त अंतराचे हायवे होतील. 11 हजार कोटींपेक्षा जास्त खर्च करणार आहोत, या क्षेत्राता विकास होईल, असे मोदींनी सांगितले. ज्या शिळेवर तुकाराम महाराांनी 13 दिवस तपस्या केली असेल, ती शिळा फक्त शिळा नव्हे ती भक्ती आणि ज्ञानाची आधारभूत शिळा असल्याचे यावेळी पंतप्रधानांनी सांगितले. देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. जगातील प्राचीन सभ्येत आपण एक आहोत. याचे श्रेय संत आणि ऋषिंना जाते. भारत शाश्वत आहे कारण संतांची भूमी आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
हेही वाचा -Tukaram Pagdi : पंतप्रधानांना देण्यात येणाऱ्या तुकाराम पगडीवरील अभंग बदलला; 'हे' आहे कारण