महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अतिवृष्टीचा फटका... पालेभाज्या महागल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री

राज्यात झालेल्या अतिवृष्टीने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारात येणारी भाजीपाल्याची आवक घटली आहे. परिणामी भाज्यांच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

vegetables price increased
पालेभाज्या महागल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री

By

Published : Oct 23, 2020, 9:13 AM IST


पुणे- अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांमध्ये भाजीपाल्यांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. त्यामुळे बाजारात येणारी आवक घटली आहे. परिणामी भाजिपाल्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला चाप बसत आहे. मात्र, अतिवृष्टीने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पालेभाज्याच्या माध्यमातून थोडासा दिलासा मिळाला आहे.

यंदा पावसाळ्यात शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली होती. त्यामुळे अतिवृष्टीच्या आधी भाजीपाल्यांची आवक वाढली होती आणि दरही उतरले होते. मात्र, त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीने भाजीपाल्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे भाजीपाल्यांची आवक घटली असून बाजारात भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. पुण्यातील बाजार समितीमध्ये येणाऱ्या भाजीपाल्याची आवक घटली आहे. परिणामी कांदा, बटाटा, गवार, हिरवी मिरची, शिमला मिर्ची, फ्लॉवर, कोबी , घेवडा यांच्या भावात वाढ झाली आहे.

पालेभाज्या महागल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री

पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या महात्मा फुले मंडईतही भाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ज्या भाज्यांची किंमत एका आठवड्याअगोदर 20 ते 25 रु किलो होती, तीच भाजी आज 50 ते 60 रु किलो नी विकली जात आहे. ग्राहकांनाही भाजीपाला विकत घेताना खिशाला झळ पोहोचत आहे. साधारणता प्रत्येक भाजी ही 40 ते 50 टक्क्यांनी महाग झाली आहे. पावसामुळे ज्या भाज्या पिकल्या होत्या, तयार होत्या त्या सर्व भाज्या खराब झाल्या आणि ज्या शिल्लक राहिल्या ते बाजारात येणारे प्रमाण कमी आहे. त्यामुळे आता भाव वाढला असल्याची माहिती महात्मा फुले मंडईतील व्यापारांनी दिली.


भाजीपाल्यांचे दर ( प्रति किलो )
शिमला 70 रु
गवार 80 रु
मिरची 80 रु
बटाटे 50 रु
कांदा 120 रु
कोबी 80 रु
दोडका 60 रु
कारले 60 रु
कोथंबीर 20 रु एक जुडी
दुधी भोपळा 50 रु
पालक 30 रु
काकडी 40 रु
वांगे 50 रु
शेपू 20 रु एक जुडी


ABOUT THE AUTHOR

...view details