महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवड : 521 सार्वजनिक तर 51 हजारांहून अधिक घरगुती गणपती मूर्तींचे विसर्जन - Pune prestigious Ganpati news

पुण्यात मंगळवारी बाप्पाला निरोप देण्यात आला. रात्रीपर्यंत शहरातील 521 सार्वजनिक गणपती मंडळांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करत मंडपातील कृत्रिम हौदात विसर्जन केले. याशिवाय 51 हजार 410 घरगुती गणपतींचे विसर्जन घरात तसेच महानगर पालिकेला मूर्ती दान देत करण्यात आले.

prestigious Ganpati mandals in Pune to immersion at mandap
पिंपरी-चिंचवड : 521 सार्वजनिक तर 51 हजाराहून अधिक घरगुती गणपती मूर्तींचे विसर्जन

By

Published : Sep 2, 2020, 2:01 PM IST

पुणे - पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेल्या विसर्जनाबाबतच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिला. नागरिकांनी कुठेही गर्दी न करता घरातच बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन केले. असेच सहकार्य नागरिकांकडून अपेक्षित आहे, अशी भावना महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केली. तसेच त्यांनी शहरातील ५२१ सार्वजनिक तर ५१ हजार ४१० घरगुती गणेश मूर्तींचे मंगळवारी रात्रीपर्यंत विसर्जन करण्यात आल्याची माहिती दिली.

नगरपालिकेला दान करण्यात आलेल्या गणेश मूर्ती

पिंपरी-चिंचवड शहरातील काही सार्वजनिक गणपती मंडळांनी गणेशोत्सव साजरा न करण्याचे ठरवले होते. तसेच आवाहन देखील पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी केले होते. त्यानुसार, मोजक्याच मंडळांनी अत्यंत साध्या पद्धतीने गणपती बाप्पांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केल्याचे पाहायला मिळाले. दरवर्षी मंडळांमध्ये सजावटी, डेकोरोशन आणि देखावा करण्यासाठी चढाओढ असते. मात्र यावर्षी कोरोना संकटामुळे बाप्पांची आराधना करत अत्यंत साध्या पद्धतीने करत गणपतीचे आगमन झाले होते.

मंगळवारी बाप्पाला निरोप देण्यात आला. रात्रीपर्यंत शहरातील 521 सार्वजनिक गणपती मंडळांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करत मंडपातील कृत्रिम हौदात विसर्जन केले. याशिवाय 51 हजार 410 घरगुती गणपतींचे विसर्जन घरात तसेच महानगर पालिकेला मूर्ती दान देत करण्यात आले. दरम्यान, यावर्षीचा गणेश उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने डीजे विरहित झाला.

हेही वाचा -पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे पार पडले विसर्जन

ABOUT THE AUTHOR

...view details