पुणे - राज्याचे माजी गृहमंत्री दिवंगत आर.आर. पाटील यांचे भाऊ राजाराम रामराव पाटील यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. ते सध्या पिंपरी-चिंचवड शहरात सहायक पोलीस आयुक्त पदी कार्यरत आहेत. त्यांच्यासह सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव आणि पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांना देखील राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. गुणवत्तापूर्ण सेवेकरिता हा सन्मान दिला जातो.
माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या भावासह तिघांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर - पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के
राज्याचे माजी गृहमंत्री दिवंगत आर.आर. पाटील यांचे भाऊ राजाराम रामराव पाटील यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. त्यांच्यासह सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव आणि पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांना देखील राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. गुणवत्तापूर्ण सेवेकरिता हा सन्मान दिला जातो.
राजाराम पाटील यांनी आत्तापर्यंत मुंबई, कोडोली, जयसिंगपूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी इत्यादि ठिकाणी सेवा बजावली आहे. ३२ वर्षांच्या कारकीर्दीत उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना ६४२ बक्षिसे मिळाली आहेत. गुणवत्तापूर्ण सेवेसाठी त्यांना यापूर्वी २००६ ला राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले होते.
रामचंद्र जाधव यांची एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळख आहे. तेही पिंपरी-चिंचवड शहरात सहायक पोलीस आयुक्तपदी कार्यरत आहेत. तर, बालाजी सोनटक्के हे गुन्हे शाखेचे काम पाहतात. महाराष्ट्रातील पाच जणांना राष्ट्रपती पोलीस पदक मिळाले आहे. या सन्मानामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची मान अभिमानाने उंचावली आहे, अशी प्रतिक्रीया पोलीस आयुक्त आर.के. पदमनाभन यांनी ईटीव्ही भारत सोबत बोलताना दिली.