महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत भारतीय नौदलाची भूमिका महत्त्वपूर्ण, राष्ट्रपतींचे गौरवोद्गार

लोणावळा येथील भारतीय नौदलाच्या आयएनएस शिवाजी या प्रशिक्षण संस्थेला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती ध्वज (प्रेसिडेंट कलर) प्रदान करण्यात आला. देशाच्या सुरक्षेत आणि राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत भारतीय नौदलाची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या कार्यक्रमात केले.

President Ram Nath Kovind
राष्ट्रपती रामनाथ कोविंद

By

Published : Feb 13, 2020, 5:46 PM IST

पुणे -देशाच्या सुरक्षेत आणि राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत भारतीय नौदलाची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. गुरुवारी लोणावळा येथील भारतीय नौदलाच्या आयएनएस शिवाजी या प्रशिक्षण संस्थेला राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती ध्वज (प्रेसिडेंट कलर) प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, नौसेना अध्यक्ष अॅडमिरल करमबीर सिंह हेही उपस्थित होते.

राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत भारतीय नौदलाची भूमिका महत्त्वपूर्ण

देशाची सागरी अर्थव्यवस्था लोकांच्या हिताशी जोडलेली आहे. बहुतांश व्यापार समुद्र मार्गाने केला जात आहे. त्यामुळे फक्त राष्ट्रीय सुरक्षाच नव्हे, तर देशाच्या आर्थिक सुरक्षेत आणि राष्ट्रनिर्मितीच्या विस्तृत प्रक्रियेत भारतीय नौदलाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. नौदल हे आपल्या समुद्री सामर्थ्याचे प्रतीक आहे. समुद्री सीमांचे संरक्षण करण्यासाठी, व्यापारी मार्ग सुरक्षित करण्यासाठी आणि नागरी आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यात नौदलाने कायम सहभाग दिला आहे. त्यांच्या या धाडसी कार्याचा देशाला अभिमान आहे. भविष्यातही नौदलाच्या माध्यमातून निश्चितच गौरवास्पद कामगिरी घडेल, असा विश्वास कोविंद यांनी व्यक्‍त केला.

हेही वाचा -कोस्टल रोड प्रकल्पात इस्त्राइल इको फ्रेंडली विटांचा होणार वापर, समुद्री जीवांना वाचविण्यासाठी निर्णय

आयएनएस शिवाजी ही संस्था मागील 75 वर्षांपासून भारतीय नौदलातील नौसैनिकांना अभियांत्रिकीचे प्रशिक्षण देण्याचे काम करत आहे. या कार्याचा गौरव म्हणून संस्थेला राष्ट्रपती ध्वज (प्रेसिडेंट कलर) प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना नौदलाच्यावतीने मानवंदना देण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details