बारामती-विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी बारामतीत प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. बारामतीत १ हजार १५३ शिक्षक मतदार असून, त्यात ३३५ महिला व ८१८ पुरुष मतदारांचा समावेश असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब कांबळे व तहसीलदार विजय पाटील यांनी दिली.
तर पदवीधर मतदार संघासाठी बारामतीत ८ हजार १५८ मतदार असून, यात ५ हजार ६७५ पुरुष तर २ हजार ४८३ महिला मतदारांचा समावेश आहे. पदवीधरांसाठी १४ तर शिक्षक मतदारांसाठी ६ मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. १२८ अधिकारी व कर्मचारी या मतदान केंद्रावर कार्यरत असणार आहेत. ही निवडणूक योग्यरीत्या पार पाडावी म्हणून ९ भरारी पथके तयार करण्यात आली असून, प्रत्येक पथकात तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.