देहू ( पिंपरी-चिंचवड ) -पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या ( 14 जून ) देहूत दाखल ( Prime Minister Narendra Modi Dehu Visit ) होणार आहे. त्यांच्या हस्ते शिळा मंदिर, जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या ( Sant Tukaram Maharaj ) मूर्तीचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यानंतर ते वारकऱ्यांना संबोधित करणार आहेत. तेथील तयारी अंतिम टप्प्यात आली असून त्या 30- 40 हजार वारकरी, नागरिक बसतील अशी आसन व्यवस्था करण्यात आली आहे.
PM Modi Dehu Visit : पंतप्रधानांच्या सभास्थळी जय्यत तयारी; 30 ते 40 हजार वारकरी राहणार उपस्थित - नरेंद्र मोदी देहू दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ( Prime Minister Narendra Modi Dehu Visit ) मंगळवारी ( 14 जून ) रोजी देहूत शिळा मंदिर, जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या ( Sant Tukaram Maharaj ) मूर्तीचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यानंतर ते वारकऱ्यांना संबोधित करणार आहेत. या सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
पीएम देहू दौरा
ढगाळ वातावरण असल्याने मंडप वॉटर प्रूफ पद्धतीचे तयार करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या ( मंगळवारी ) वारकरी संप्रदायाला काय संबोधित करणार आहेत ? याकडे सर्वांचे लक्ष लागले असून पोलिसांचा मोठा फौजफाटा देहूत दाखल झाला आहे. वारकरी उद्याच्या दिवसाची वाट पाहत असून मोदी पहिल्यांदाच देहूत येणार असल्याने वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
Last Updated : Jun 13, 2022, 3:11 PM IST