महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

होळीनिमित्त पुणे बाजारपेठ सजली, विविध आकाराच्या पिचकाऱ्या उपलब्ध - पुणे बाजारपेठ

लहान मुलांना खेळण्याची अतिशय आवड असते. हुबेहुब खेळण्याच्या आकाराच्या पिचकाऱ्या बाजारात आहेत. तसेच पिकाचू, शिनचॅन अशा प्रकारचे कार्टून्स आणि अॅक्शन चित्रपटावर आधारित पिचकाऱ्याही आहेत. यासोबतच नैसर्गिक रंगाकडे मुलांचा ओढा वाढताना दिसत आहे.

होळीनिमित्त पिचकाऱ्यांनी सजलेली बाजारपेठ

By

Published : Mar 20, 2019, 5:21 PM IST

Updated : Mar 20, 2019, 8:52 PM IST

पुणे -होळी आणि धुलीवंदनाच्यानिमित्त पुणे बाजारपेठ विविध रंग आणि पिचकाऱ्यांनी सजलेली आहे. यामध्ये विविध आकाराच्या पिचकाऱ्या उपलब्ध आहेत.

होळीनिमित्त सजलेली बाजारपेठ आणि त्याबद्दल माहिती देताना व्यावसायिक

लहान मुलांना खेळण्याची अतिशय आवड असते. हुबेहुब खेळण्याच्या आकाराच्या पिचकाऱ्या बाजारात आहेत. तसेच पिकाचू, शिनचॅन अशा प्रकारचे कार्टून्स आणि अॅक्शन चित्रपटावर आधारित पिचकाऱ्याही आहेत. यासोबतच नैसर्गिक रंगाकडे मुलांचा ओढा वाढताना दिसत आहे. तसेच रंगाबाबत होणाऱ्या जनजागृतीमुळेही पालकही आपल्या मुलांना नैसर्गिक रंग वापरण्याच्या सूचना देताना दिसतात. त्यामुळे नैसर्गिक रंगाना बाजारपेठेत मोठी मागणी आहे. यापूर्वी नैसर्गिक रंग कोरडे मिळायचे. मात्र, आता पाण्यातील रंग उपलब्ध झाल्याने बच्चेकंपनी आनंदी दिसत आहे.

होळी आणि रंगपंचमीच्यानिमित्ताने विविध स्लोगन्स असलेले टी-शर्ट सुद्धा बाजारात उपलब्ध आहेत. त्या टीशर्टला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे व्यावसायिक सांगतात.

Last Updated : Mar 20, 2019, 8:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details