दौंड (पुणे) -प्रसूती कळा येत असल्याने रुग्णालयात भरती झालेल्या एका महिलेला डॉक्टरकडूनच अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना दौंड तालुक्यातील यवत येथे घडली आहे. याबाबत यवत पोलीस स्टेशनमध्ये डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूजा गोरख दळवी असे मारहाण झालेल्या गरोदर महिलेचे नाव असून त्यांनी यवत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.
गरोदर महिलेला डॉक्टरकडून अमानुष मारहाण; डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल
प्रसूती कळा येत असल्याने ही महिला यवत येथील जयवंत हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाली होती. त्यावेळी तेथील डॉक्टरांनी या महिलेला तोंडावर, डोक्यावर, हातावर, अमानुष मारहाण केल्याचे तीने तक्रारीत म्हटले आहे. ही मारहाण इतकी अमानुष होती की या मारहाणीमुळे पूजा दळवी यांच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
गरोदर महिला

हेही वाचा -शिवसेनेला गोव्यात भविष्य नाही, केंद्रीय नेतृत्व प्रसिद्धीच्या मागे; राखी नाईक यांचा राजीनामा
Last Updated : Oct 17, 2021, 4:05 PM IST