पुणे - चाकण उद्योगनगरीत अरगडे रुग्णालयात गरोदर महिलेवर उपचार करतानाच संबंधित महिलेसह अर्भकाचाही मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सपना पवळे, असे मृत महिलेचे नाव आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच ही घटना घडल्याचा आरोप नातलगांनी केला आहे. या घटनेमुळे रुग्णालयाबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले असून चाकण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
उपचारादरम्यान गरोदर महिलेसह अर्भकाचा मृत्यू; नातेवाईकांचा डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप - नातेवाईक
गरोदर महिलेवर उपचार करतानाच संबंधित महिलेसह अर्भकाचाही मृत्यू झाल्याची घटना चाकण उद्योगनगरीत अरगडे रूग्णालयात घडली आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच ही घटना घडल्याचा आरोप नातलगांनी केला आहे. या घटनेमुळे रुग्णालयाबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले असून चाकण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
उपचारादरम्यान गरोदर महिलेसह अर्भकाचा मृत्यू
विशेष म्हणजे उपचारादरम्यानच बाळाचाही आईच्या पोटातच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली. संबंधित महिलेला प्रसूतीसाठी गुरुवारी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
रूग्णालयाबाहेर मृत महिलेचे नातलग आक्रमक झाले असून चाकण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. नातेवाईकांनी महिलेचा मृतदेह रूग्णलायसमोरच रुग्णवाहिकेत ठेवला असून डॉक्टरला अटक करण्याची मागणी केली आहे.
Last Updated : May 10, 2019, 1:27 PM IST