महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

येत्या ४८ तासात मुंबईत मुसळधार, हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा - India Meteorological Department

पुणे वेधशाळेने पुढील दोन दिवस मुंबईत अतिवृष्टी होईल, असा इशारा दिला आहे. पुणे वेधशाळेचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी ही माहिती दिली. पुढील दोन दिवस मुंबईत अतिवृष्टी होईल, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.

संग्रहित छायाचित्र

By

Published : Jul 8, 2019, 7:29 PM IST

Updated : Jul 9, 2019, 12:24 AM IST

मुंबई- मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. पुणे वेधशाळेने पुढील 2 दिवस मुंबईत अतिवृष्टी होईल, असा इशारा दिला आहे. पुणे वेधशाळेचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी ही माहिती दिली. म्हणजेच आजपासून 3 दिवस मुंबईत अतिवृष्टी होणार आहे. तर कोकण गोव्यात 5 दिवस सर्वदूर पाऊस सुरू असून अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

पुणे वेधशाळेचे प्रमुख अनुपम कश्यपी

मध्य महाराष्ट्रात आज आणि उद्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. विदर्भात 2 दिवस अनेक ठिकाणी सर्वत्र पाऊस पडेल. तर कोकण, गोवा आणि मुंबईसह उपनगरांत अतिवृष्टी होईल. मुंबईत 25 सेंटीमीटर पाऊस पडेल. तर 11 आणि 12 तारखेला मुंबई आणि उपनगरात थोड्या प्रमाणात पाऊस होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रात येत्या 24 तासात अतिवृष्टीची शक्यता आहे. त्यानंतर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची चेतावणी नाही.

त्याचबरोबर पुण्यातही आज आणि उद्या हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे. 10 तारखेला थोडा पाऊस कमी होईल. त्यानंतर पुढील तीन दिवस पाऊस कमी होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

Last Updated : Jul 9, 2019, 12:24 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details