महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जुन्नरमध्ये पार पडली पद्मावती देवीची पारंपरिक पूजा, बळीराजाच्या समृद्धीसाठी गाऱ्हाणे

वरुणराजाच्या कृपेने जोरदार पाऊस व्हावा. बळीराजाच्या शेतात भरपूर प्रमाणात पीक यावे, त्यातून चांगले उत्पन्न मिळून बळीराजाच्या आयुष्यात सुख-समृद्धी नांदावी यासाठी गावकरी गावच्या जवळच असलेल्या पद्मावती मंदिराजवळ एकत्रित येऊन पद्मावती देवी व गंगा पूजन करतात.

prayers sent to godess padmavati in junnar for better rains and better crops

By

Published : Jul 31, 2019, 2:34 PM IST

Updated : Jul 31, 2019, 2:57 PM IST

पुणे - जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी वैशाखखेडे येथे गेल्या अनेक वर्षांपासून पद्मावती देवीची पूजा करण्याची परंपरा आहे. दरवर्षी आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी ही पूजा संपन्न होते.

जुन्नरमध्ये पार पडली पद्मावती देवीची पारंपरिक पूजा, बळीराजाच्या समृद्धीसाठी गाऱ्हाणे

वरूणराजाच्या कृपेने जोरदार पाऊस व्हावा. बळीराजाच्या शेतात भरपूर प्रमाणात पीक यावे, त्यातून चांगले उत्पन्न मिळून बळीराजाच्या आयुष्यात सुख-समृद्धी नांदावी, यासाठी गावकरी गावच्या जवळच असलेल्या पद्मावती मंदिराजवळ एकत्रित येतात. या ठिकाणी ते पद्मावती देवीसह गंगा पूजन करतात.

अनेक वर्षांची ही परंपरा गावकरी आजही तितक्याच उत्साहात जोपासतात. यावर्षीदेखील गावकऱ्यांनी पद्मावती देवीसह, कुकडी नदीची पूजा केली आणि कुकडी मातेला चोळी-पातळ अर्पण केले.

Last Updated : Jul 31, 2019, 2:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details